चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली नवजात चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 03:04 PM2020-12-07T15:04:04+5:302020-12-07T15:14:17+5:30

प्रेग्नन्सीची ही घटना अमेरिकेतून समोर आली आहे. येथील टीना गिब्सन नावाच्या महिलेने ऑक्टोबर महिन्यात मुलीला जन्म दिला.

जर जन्म घेताच कुणाचं वय २७ वर्षे असेल तर यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. येथील एका महिलेने तिच्या २७ वर्षाच्या मुलीला जन्म दिलाय. ही महिला स्वत: अजून २९ वर्षाची झालेली नाही. पण तिने ज्या बाळाला जन्म दिला ते २७ वर्षांचं आहे. हे शक्य झालंय सायन्समुळे. अमेरिकेतील या महिलेने हे शक्य करून दाखवलंय. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण..

प्रेग्नन्सीची ही घटना अमेरिकेतून समोर आली आहे. येथील टीना गिब्सन नावाच्या महिलेने ऑक्टोबर महिन्यात मुलीला जन्म दिला. पण ही डिलिव्हरी चर्चेचा विषय ठरली कारण तिच्या मुलीचं जन्मावेळचं वय २७ वर्षे होतं.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं कसं शक्य आहे? तर हे सगळं सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने शक्य झालं. टीना गिब्सनचा जन्म १९९१ मध्ये झाला होता. जेव्हा टीनाचं लग्न बेंजामिनसोबत झालं तेव्हा त्यांना गर्भधारणेसाठी समस्या झाली. दोघांच्या लग्नाला १० वर्षा झाली पण टीना प्रेग्नेंट होऊ शकली नाही.

चौकशीतून समोर आलं की, टीनाचा पती बेंजामिनला सिस्टीक फायब्रोसिस नावाचा आजार होता. यात बाळाचा जन्म देण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो. यामुळेच टीना प्रेग्नेंट राहू शकत नव्हती.

टीनाने २०१७ मध्ये एम्ब्रयो डोनेशनबाबत वाचलं होतं. यानंतर या कपलने एम्ब्रयोला दत्तक घेण्याचा प्लॅन केला. टीनाने ज्या एम्ब्रयोला दत्तक घेतलं ते २४ वर्षांपासून फ्रिज केलेलं होतं.

२०१७ मध्ये जन्माला आलेल्या एमाला २४ वर्षांआधी फ्रिज करण्यात आलं होतं. पण २०२० मध्ये मॉलीच्या जन्माने एमाचा रेकॉर्ड मोडला. मॉलीच्या एम्ब्रयोला २७ वर्षापासून फ्रिज करण्यात आलं होतं.

एम्ब्रयो डोनेशन संस्थेत आयव्हीएफ करण्यासाठी येणारे लोक आपलं एम्ब्रयो इथे डोनेट करतात. यानंतर हे भ्रुण फ्रिज केलं जातं. हे अनेक वर्षे फ्रिज केलं जातं.

ज्या लोकांना गर्भधारणेत अडचण येते ते लोक हे एम्ब्रोज दत्तक घेतात. हे मेडिकल प्रोसेसने गर्भात टाकून गर्भधारणा केली जाते. टीमा आणि बेंजामिनने अशाप्रकारेच एमा आणि मॉलीला जन्म दिलाय.

Read in English