दिसायला चांगली नव्हती म्हणून पार्टनरनं केलं ब्रेकअप; मग हिनं सर्जरी केली अन् आता... पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 19:52 IST2020-11-20T19:22:34+5:302020-11-20T19:52:01+5:30

सुंदरतेच्या व्याख्या प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळ्या असतात. रिलेशनशिपला सुरूवात करताना एखादा मुलगा किंवा मुलगी चांगली दिसत नाही म्हणून नकार दिला. अशी अनेक उदाहरण तुम्ही पाहिली असतील. काहीही म्हटलं तरी आजही मोठ्या संख्येने लोक चेहरा पाहून होकार देतात.

आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत. व्हिएतनामच्या सोशल मीडियावर या मुलीची मोठी चर्चा आहे. बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अवघ्या 19 व्या वर्षात तिने प्लास्टिक सर्जरी केली.

एका मुलीला अकरावीत असताना तिच्या बॉयफ्रेंडने ती चांगली दिसत नाही म्हणून ब्रेकअप केलं होतं. ही मुलगी व्हिएतनामची रहिवासी आहे.

तिनं दिलेल्या माहितीनुसार दिसायला चांगली नसल्यामुळे तिला कोणताही बॉयफ्रेंड मिळत नव्हता. काही दिवसांतच दोघांचं ब्रेकअप झालं.

त्यानंतर तिने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली. आता प्लास्टिक सर्जरीनंतर ती अतिशय सुंदर दिसू लागली आहे.

एकदा पार्टीत लोक काहीतरी कुजबुजत होते. इतक्या सुंदर मुलाला अशी गर्लफ्रेंड कशी मिळाली अशी चर्चा करत असल्याचं, तुओंग वीएन हिने सांगितलं. त्यानंतर ती खूप उदास झाली.

मग तीने तिने स्वत: बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्याचं ठरवलं आणि त्यानेही तिला लगेचच सहमती दिली. त्यानंतर काही दिवसातच तिच्या बॉयफ्रेंडने वेगळ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायची सुरूवात केली.

ही गोष्ट खटकल्यानंतर तीने स्वतःचा लूक बदलण्याचा निर्णय घेतला. आता ही तरूणी अतिशय सुंदर दिसत असून सोशल मीडियावर या तरूणीचे फोटो व्हायरल होत आहेत. (Image Credit- kienthuc.net.vn)

Read in English