जगाला धोका! खतरनाक जैविक हत्यार बनवतेय चीन-पाकिस्तान; ऑस्ट्रेलियाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:00 PM2020-08-26T13:00:28+5:302020-08-26T13:04:19+5:30

वुहानचे वैज्ञानिक पाकिस्तानात 2015 पासून खतरनाक व्हाय़रसवर संशोधन करत आहेत. कोरोनाला जन्म देण्याचा आरोप होत असलेल्या वुहानच्या इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला याची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची वेबसाईट क्लाक्सोनने हा दावा केला आहे.

चीन आणि पाकिस्तान मिळून खतरनाक जैविक हत्यार बनवत आहेत. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या आडून हे कृत्य केले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून यावर काम सुरु असल्याचा ऑस्ट्रेलियाने खळबळजनक दावा केला आहे.

धक्कादायक म्हणजे कोरोनाला जन्म देण्याचा आरोप होत असलेल्या वुहानच्या इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला याची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची वेबसाईट क्लाक्सोनने हा दावा केला आहे.

अँथनी क्लान यांच्या अहवालानुसार वुहानचे वैज्ञानिक पाकिस्तानात 2015 पासून खतरनाक व्हाय़रसवर संशोधन करत आहेत.

क्लाक्सोनने गेल्या महिन्यात चीन आणि पाकिस्तानने बायो वॉरफेअरची क्षमता वाढविण्यासाठी तीन वर्षांची आणखी एक सिक्रेट डील केली असल्याचा दावा केला होता.

दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांचा स्टडी रिसर्च पेपरमध्येही छापून आला आहे.

हे संशोधन डिसेंबर 2017 ते यंदाच्या मार्चपर्यंत केलेले आहे. यामध्ये ज्युनोटिक पॅशोजन्स (जनावरांपासून माणसाला लागण होणारे व्हायरस) ची ओळख आणि लक्षणांच्या बाबतीतले आहे.

एका संशोधनात पाकिस्तानने वुहान इन्स्टिट्यूटला व्हायरस संक्रमित सेल्स दिल्याबद्दल धन्यवादही म्हटले होते. यासोबत या संशोधनाला CPEC द्वारे मदत मिळाल्याचाही उल्लेख होता.

या संशोधनात नील व्हायरस, मर्स-कोरोना व्हायरस, क्रीमिया-कॉन्गो हेमोरजिक फीवर व्हायरस, थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम व्हायरस आणि चिकनगुनियावरही प्रयोग केले गेले आहेत.

यासाठी हजारो पाकिस्तानी पुरुष, स्त्रीया आणि लहान मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यामध्ये जे लोक जणावरांसोबत काम करतात आणि दुर्गम भागात राहतात त्यांचा समावेश आहे.

या ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटनुसार चीन आणि पाकिस्तानने एक करार केला आहे. यातून दोन्ही देश संक्रमण आजारांवर शोध करत आहेत. मात्र, याच्याआडून जैविक हत्यारांवर संशोधन केले जात आहे.

सध्या या व्हायरसपासून वाचण्यासाठी कोणतेही रामबाण औषध नाहीय. या व्हायरसपैकी काही जगातील घातक आणि संक्रमक व्हायरस आहेत.

Read in English