दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आला म्हणून मॉडलने केली पतीची हत्या, संबंध ठेवण्यास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 11:07 AM2022-01-14T11:07:42+5:302022-01-14T11:17:43+5:30

Lilia Sudakova : महिलेने मान्य केलं आहे की, तिचा २८ वर्षीय पती सर्जेइ पोपोव दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आला होता. ज्यानंतर तिने त्याची हत्या केली.

रशियातील एका प्रसिद्ध मॉडलने हे कबूल केलं आहे की, तिचा पती दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आला होता. त्यामुळे तिने त्याचा खून केला. मॉडलने पतीवर चाकूने अनेक वार करत त्याचा जीव घेतला. २७ वर्षीय लिलिया सुदाकोवा ही एक आंतराष्ट्रीय मॉडल असून वोगसहीत अनेक मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली आहे.

महिलेने मान्य केलं आहे की, तिचा २८ वर्षीय पती सर्जेइ पोपोव दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आला होता. ज्यानंतर तिने त्याची हत्या केली. ही घटना रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील आहे. आता लिलियाला १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

'डेली स्टार'नुसार, मॉडल लिलियाने तिचा गुन्हा कबूल केला आहे. लिलिया म्हणाली की, तिने तिच्या पतीसोबत सेक्स करण्यास नकार दिला होता. ज्यानंतर पती एका दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आला होता. लिलिया म्हणाली की, तिचा पती तिला मारहाणही करत होता. तिने तिच्या पतीला सेल्फ डिफेन्स करताना मारलं.

लिलियाने पोलिसांना सांगितलं की, 'जेव्हा पती घरी आला होता तेव्हा नशेत होता. त्याच्यासोबत एक महिला होती. मला समजलं होतं की, तो हे का करतोय. महिलेला आणून त्याला हे दाखवायचं होतं की, तो कुणासोबतही सेक्स करू शकतो. त्याला एक दिवसाआधी माझ्यासोबत सेक्स करायचा होता'.

लिलियाने सांगितलं की, जेव्हा तो महिलेला घेऊन आला तेव्हा ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाण्याआधी तिने पतीसोबत आलेल्या महिलेला विचारलं की, तू काही खाणार का? तेव्हा तिचा पती म्हणाला की, त्यालाही काहीतरी खायला हवं. पण लिलियाने त्याला काही खायला देण्यास नकार दिला. यावरून तो संतापला. लिलिया म्हणाली की, ती चाकूने टोमॅटो कापत होती.

तेव्हाच तिने चाकूने पतीवर हल्ला केला. यादरम्यान सोसायटीमध्ये राहणाऱ्या मित्राने वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लिलियाने पतीवर पुन्हा हल्ला केला. त्याने वाचण्याचा प्रयत्न केला तर चाकू त्याच्या छातीत लागला. लिलिया म्हणाली, पतीचं रक्त पाहून ती घाबरली आणि तिने अॅम्बूलन्सला फोन केला. तिने यावेळी पतीला माफीही मागितली. पण नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नंतर लिलियाला पोलिसांनी अटक केली. गेल्या आठ महिन्यांपासून कोर्टात ट्रायल सुरू आहे. तेच मॉडलने तिची कहाणी Why Women Kill नावाच्या एका शोमध्ये पत्रकारासमोर सांगितली आहे.