चमत्कार! रशियानं अवघ्या २० दिवसांत उभारलं १० हजार बेड्सचं रुग्णालय; चीनचा रेकॉर्ड ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 09:00 PM2020-04-10T21:00:42+5:302020-04-10T21:09:31+5:30

कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनमधलं वुहान शहर हे कोरोनाचं केंद्रबिंदू समजलं जातं. कोरोना व्हायरस पीडित रुग्णांना स्वतंत्र वॉर्ड(विलगीकरण कक्षात)मध्ये ठेवले जाते.

परंतु अशी व्यवस्था चीनमधील सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध नव्हती. म्हणूनच चिनी अवघ्या काही दिवसांत १ हजार बेड्सचं रुग्णालय उभारलं होतं.

चीनचा हा रेकॉर्ड रशियानं मोडून काढला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वुहानच्या धर्तीवर रशियानं अवघ्या २० दिवसांत १० हजार लोकांवर उपचार करण्यासाठी मोठं रुग्णालय उभारलं आहे.

रशियानं अशा प्रकारची १८ रुग्णालये बांधली आहेत. दहा हजारांहून अधिक मजुरांच्या मेहनतीनं रुग्णालय तयार केले आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी रशियानं उभारलेल्या १८ रुग्णालयांमधलं हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. उर्वरित रुग्णालये सैन्याने बांधली आहेत. या रुग्णालयातील अर्धे बेड्स आयसीयू आणि व्हेंटिलेटर इत्यादी सुविधांनी सुसज्ज आहेत.

रशियाने आतापर्यंत कोरोना विषाणूशी संबंधित १० लाख चाचण्या घेतल्या आहेत. मॉस्कोचे मोठे रुग्णालय कोरोनाग्रस्त व्हीआयपींनी भरलेले आहे.

रशियामधली कोरोनाशी संबंधित ६९% प्रकरणे ही मॉस्कोतली आहेत.

सर्वात वाईट परिस्थिती अद्याप येणे बाकी असल्याचा इशाराही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.

रशियाने माणसांवरच्या उपचारासाठी लस बनवण्याचे प्रयोग सुरू केले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून देशात दररोज जवळपास एक हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

रशियामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पार गेली असून, आतापर्यंत कोरोनानं रशियात 76 लोकांचा मृत्यू झाला आहे.