धक्कादायक! कैद्यानं थेट कारागृहातच बोलावली कॉल गर्ल; फोटो समोर आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:58 PM2021-06-26T22:58:28+5:302021-06-26T23:09:08+5:30

call girl into jail : कारागृहात आलेल्या संशयीत महिलेचा शोध घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात कॉल गर्ल येणे म्हणजे कारागृहातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.

एका कैद्याने थेट कारागृहातच कॉल गर्ल बोलावल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलने काढलेले काही फोटो समोर आल्यानंतर उघड झाला. हे फोटो समोर आल्याने संबंधित जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणामुळे जबरदस्त खळबळही उडाली आहे. (Prisoner calls call girl into jail cell)

ही घटना इंग्लंडमधील सफोक येथे एचएम जेल होलेस्ले बे येथे घडली. येथे एका कैद्याने कॉल गर्ल बोलावली. मोबाईलने तीचे घाणेरडे फोटो काढले. यानंतर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर एकच गोंधळ उडाली आहे.

अशा पद्धतीने कॉल गर्ल कारागृहात पोहोचल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढेच नाही, तर कारागृहात कैद्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर बंदी आहे, मग कैद्याकडे मोबाईल आला कसा? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित कैदी ड्रग्सच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत आहे. याप्रकरणी लेबर खासदार आणि कॉमन्स जस्टिस सेलेक्ट कमेटीचे सदस्य अँडी स्लॉटरने म्हटले आहे की 'खुली कारागृह पुनर्वसनाची ठिकाणं आहेत, लोकांसाठी 'अय्याशी'चे जीवन जगण्याचा अड्डा नाही.

याप्रकरणी, पोलीस तपास करत आहेत. कारागृहात आलेल्या संशयीत महिलेचा शोध घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात कॉल गर्ल येणे म्हणजे कारागृहातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे, महिलेने अशा प्रकारे कारागृहात येऊन आपला जीव धोक्यात टाकला. ती पुरुषांच्या कारागृहात एकटीच आली होती. या कारागृहात अट्टल गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. येथे अनेक आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यातही शिक्षा भोगत आहेत.

असेही म्हटले जात आहे, की कारागृहातील कैद्यांना त्या महिलेसंदर्भात माहिती मिळाली असती, अन्यथा तिच्यावर सहज हल्ला होऊ शकला असता. तिचा जीव धोक्यात येऊ शकत होता.

ही महिला कारागृहातील कैद्याची गर्लफ्रेंड नव्हती, असेही सांगितले जात आहे.

कारागृह प्रशासनाचे प्रवक्ता म्हणाले, 'अशी कृती अस्वीकारार्ह आहे आणि यासाठी गुन्हेगाराला शिक्षा देण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच कारागृहाच्या सुरक्षिततेसाठीही इतर काही उपाय करण्यात आले आहेत.