Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:05 IST2025-07-29T15:47:35+5:302025-07-29T16:05:18+5:30
पाकिस्तानसाठी पाण्याची मोठी समस्या बनली आहे. सध्या ते पुरामुळे झालेल्या नुकसानीसोबत झुंजत आहेत. पण येणाऱ्या काळात ते पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेले असणार आहेत.

ऑपरेशन संदूर राबवण्याआधी भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले. भारताने सिंधू जल करार रद्द केला. यामुळे पाकिस्तानमध्ये जलसंकट सुरू झाले.
पाकिस्तानसाठी पाणी ही एक मोठी समस्या बनली आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पूरपरिस्थीती होती. यामुळे मोठे नुकसान झाले. पण पाकिस्तानमध्ये भविष्यातील चित्र आणखी धोकादायक असू शकते.
येथे ज्या प्रकारे पाण्याचे संकट वाढत आहे, त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानला पाण्याच्या प्रत्येक थेंबाची आस लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानकडे पावसाचे आणि पुराचे पाणी साठवून ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तर दुसरीकडे भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यामुळे परिस्थिती आधीच कठीण झाली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या मते, या सर्वांमध्ये, असे काही अहवाल आले आहेत, जे भविष्यात पाकिस्तानमध्ये पाण्याची किती टंचाई निर्माण होणार आहे हे दर्शवितात.
'दक्षिण आशियात पूर आणि दुष्काळाचे चक्र सुरूच राहील. अशा परिस्थितीत पुरेशा पाणीसाठ्याअभावी पाकिस्तानच्या समस्या वाढण्याची खात्री आहे', असा इशारा पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिला आहे.
येथील शहरी आणि ग्रामीण भागात सतत पाण्याची कमतरता आहे. जल गरिबी निर्देशांकानुसार, पाकिस्तान सध्या जगातील १५ वा देश आहे जिथे पाण्याची कमतरता आहे. तसेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार, २०३५ पर्यंत पाकिस्तान पाण्याची गरज जास्त भासेल.
वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड-पाकिस्तानच्या अहवालानुसार, येथे पाणी सतत कमी होत आहे. त्यानुसार, १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये ५६०० घनमीटर पाणी असल्याचा अंदाज होता. तर २०२३ मध्ये ते ९३० घनमीटरपर्यंत कमी झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनेही याकडे लक्ष वेधले आहे. त्यानुसार, पाकिस्तानमध्ये पाण्याची कमतरता जगात सर्वाधिक आहे.
या सगळ्यामध्ये, भारताने सिंधू पाणी करार रद्द करून पाकिस्तानचा पाणीपुरवठा थांबवला आहे. या करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर अधिकार मिळाला.
येथून मिळणारे पाणी पाकिस्तानच्या ८०% शेती गरजा आणि एक तृतीयांश वीज गरजा पूर्ण करत असे. परंतु सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानच्या समस्या वाढल्या आहेत.