Photo: त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये मोदींची श्रीरामाच्या जयघोषाने भाषणाला सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:55 IST2025-07-04T08:49:35+5:302025-07-04T08:55:19+5:30
Narendra Modi Speech: पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन देशातील भारतीय समुदायाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात सिया राम आणि जय श्री रामच्या जयघोषाने केली.
भारतीयांना संबोधित करताना मोदींनी अयोध्येत श्री राम मंदिराच्या बांधकामाची, शरयूच्या गुरगुरत्या प्रवाहाची आणि महाकुंभाच्या वैभवाची कहाणी सांगितली.
"बनारस, पाटणा, कोलकाता आणि दिल्ली ही भारतातील शहरे आहेत. परंतु, त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील रस्त्यांना भारतीय शहरांची नावे देण्यात आली आहेत", असे मोदी म्हणाले.
"तो काळ दूर नाही जेव्हा एक भारतीय चंद्रावर पोहोचेल आणि भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असेल. आपण आता फक्त तारे मोजत नाही, तर आदित्य मिशनच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासाठी, चंदा मामा आता फार दूर नाही. आपण आपल्या कठोर परिश्रमाने अशक्य ते शक्य करत आहोत", असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. लवकरच, आपण जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होऊ. भारताच्या विकासाचे आणि प्रगतीचे फायदे सर्वात गरजू लोकांपर्यंत पोहोचत आहेत. गेल्या दशकात भारताने २५ कोटींहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले आहे, असे जागतिक बँकेने नमूद केले आहे"
पुढे मोदी म्हणाले की, " मी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अभिनंदन करतो, या प्रदेशात यूपीआय स्वीकारणारा हा पहिला देश आहे. आता, पैसे पाठवणे हे गुड मॉर्निंग टेक्स्ट मेसेज पाठवण्याइतके सोपे होईल."