युरोपमध्ये झालेले भीषण दहशतवादी हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 12:10 PM2017-08-18T12:10:28+5:302017-08-18T12:49:54+5:30

17 ऑगस्ट 2017 - स्पेनच्या रॅमबाल्समध्ये दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवून अनेकांना चिरडलं, ज्यात 13 जणांचा मृत्यू झाला.

17 ऑगस्ट 2017 - स्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 जण जखमी. 5 दहशतवाद्यांचा करण्यात आला खात्मा

पॅरिसच्या फ्रेंच लष्कराच्या बराकीजवळ एका कारनं सैनिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले होते.

19 जून 2017 - लंडनच्या फिन्सब्युरी पार्क येथे मशिदीबाहेरील लोकांना गाडीखाली चिरडण्यात आले, यात एकाचा मृत्यू झाला होता.

3 जून 2017 - लंडन ब्रिजवर दहशतवाद्यांनी भरधाव कारने लोकांना चिरडले. यात 8 जणांचा मृत्यू तर 48 जण जखमी झाले होते.

7 एप्रिल 2017 - स्वीडनच्या स्टॉकहोल्म गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी लॉरी घुसवली. यात 5 जणांचा मृत्यू व 14 जण जखमी झाले होते.

15 जुलै 2016 - फ्रान्समधील नीस शहरात एका ट्रकनं नागरिकांना चिरडल्याने 84 जणांचा मृत्यू झाला होता तर 100हून अधिक जण जखमी झाले ह