आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:12 IST2025-11-27T08:52:11+5:302025-11-27T09:12:48+5:30

Hong Kong Skyscraper fire: अग्निशमन दलाचे तब्बल ७०० जवान तैनात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, अनेक जण बेपत्ता

हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यातील एका मोठ्या निवासी संकुलात भीषण आग लागली. या घटनेने शहर हादरले आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.

वांग फुक कोर्ट नावाच्या या २००० फ्लॅट्सच्या निवासी संकुलात अचानक लागलेल्या आगीने जवळच्या अनेक उंच इमारतींना वेढले.

या घटनेत किमान ४४ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी बरेच जण बेपत्ता असल्याची भीती आहे.

मृतांचा आकडा वाढतच आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जखमी आणि बाधितांसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दूरवरून धुराचे लोट आणि ज्वाळा दिसत आहेत.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या ७०० जवानांना तैनात करण्यात आले. अनेक ठिकाणी, हायड्रॉलिक शिडी वापरून उंच मजल्यांवरून पाण्याच्या तोफांचा फवारणी केली जात आहे.

टॉवर्समध्ये अनेक लोक अडकल्याचे वृत्त आहे. हाँगकाँग अग्निशमन सेवा विभागाला दुपारी २:५१ वाजता आगीची सूचना देण्यात आली. विभागाने जवळच्या रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

९० टक्के लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. ही आग लेव्हल ५ची होती. त्यामुळे बरीच जीवित आणि वित्तहानी झाली आहे.