मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:04 IST2026-01-14T15:56:36+5:302026-01-14T16:04:04+5:30
Thailand Train Crash: थायलंडमध्ये भयंकर रेल्वे अपघात घडला. भरधाव निघालेल्या एका पॅसेंजर रेल्वे गाडीवर कोसळले. त्यानंतर रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरून अस्ताव्यस्त पडले.

थायलंडमधील स्थानिक वेळेनुसार ९.१३ वाजता नाखोण रतचसिमा प्रांतातील नाँग नाम खूण रेल्वे स्थानकावरून रेल्वे गाडी निकाली होती. स्टेशन निघाल्यानंतर गाडीने वेग घेतला पुढच्या रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घटना घडली.

रेल्वे गाडी जात असलेल्या रेल्वेरुळावरच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. ही बुलेट ट्रेन थायलंड आणि चीन यांना जोडणारी आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच महाकाय क्रेन रेल्वेवर कोसळले.

अचानक क्रेन कोसळल्याने रेल्वे गाडीचे डब्बे रुळावरून उलटले आणि काही डब्ब्यांनी पेट घेतला. या गाडीतून विद्यार्थी आणि ऑफिसला निघालेल्या लोकांची संख्या अधिक होती. २८ जणांचा मृत्यू झाला.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, क्रेनमुळे एका स्लाईस सारखी जाऊन पडली. रेल्वेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की, मी वेगाने हवेत फेकला गेला आणि पडलो.

थायंलडमधील स्थानिक प्रशासनाने सांगितले की, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेसाठी जे जबाबदार आहेत, त्या कठोर शिक्षा करण्यात येईल, असे सांगितले.

सध्या चीन आणि थायलंड यांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. खाली रेल्वे रुळ असून, त्यावरच उन्नत (पूल उभारून) मार्ग बुलेट ट्रेनसाठी तयार केला जात आहे.

थायलंडमधील या प्रोजेक्टमध्ये चीनची कंपनी किंवा कामगार नाहीत. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, ती थायलंडमधीलच असल्याचे चीनच्या दूतावासाने म्हटले आहे.

















