वडिलांनी देशासाठी विश्वचषक जिंकला; मुलीने अ‍ॅडल्ट प्लेटफॉर्मवर काम करण्याचा निर्णय घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 02:35 PM2023-03-03T14:35:10+5:302023-03-03T14:51:19+5:30

कोण आहे ही तरुणी, पाहा....!

देशाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या एका खेळाडूच्या मुलीने अ‍ॅडल्ट कन्टेंट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. डेनियल फवात्तो असं या तरुणीचं नाव असून तिच्या वडिल ब्राझीलमधील एक प्रसिद्ध फुलबॉलपटू आहेत.

डेनियलचे इन्स्टाग्रामवर दोन लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने या वर्षाच्या जानेवारी महिन्यात मुलीला जन्म दिला. तिचा पती फाबियो एनरिक देखील एक फुलबॉलपटू आहेत.

सदर घेतलेल्या निर्णयाबाबत डेनियलने सांगितले की, मी माझी प्रोफाईल तयार केली आहे, जेणेकरून मला पहिल्यांदा आई होण्याच्या माझ्या अनुभवांबद्दल सांगता येईल. मला मूल नको होतं, पण कसा तरी मी माझा विचार बदलला.

मुलांशी कसे वागावे हे मला कळत नव्हते. विमानातल्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून मी अस्वस्थ व्हायची. या विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझा प्रोफाईल तयार केला आहे, असं डिनियलने सांगितले.

लहान मुलांबाबत मी दररोज शिकत असल्याने, मला वाटले की या विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल तयार करणे ही एक चांगली कल्पना आहे, असं डिनियलने सांगितले.

'मी गर्भनिरोधक गोळ्या घेणे बंद केले होते आणि एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मी गरोदर राहिली. आई बनणे हे माझ्यापेक्षा माझ्या प्रियकराचे स्वप्न होते.

आठ वर्षे मी गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. मात्र मी या गोळ्या काही दिवसांसाठी बंद केल्या आणि त्याच महिन्यात मी गरोदर राहिली, असं डेनियलने सांगितले.