CoronaVirus: कोरोना व्हायरसचा खरा चेहरा उघड; वैज्ञानिक जिवावर उदार झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 09:58 PM2020-03-07T21:58:39+5:302020-03-07T22:07:49+5:30

CoronaVirus: आजपर्यंत अनेक बातम्या, व्हीडिओंमध्ये तुम्ही गुलाबी, जांभळ्या अशा वेगवेगळ्या आकारात फोटो पाहिले असतील. आणि हा व्हायरस तसाच दिसत असेल असे तुम्हाला वाटले असेल. पण ते सारे कल्पित फोटो होते. कोरोना व्हायरसचा एकदम खराखुरा फोटो जारी करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस हे नाव आज जगात अणुबॉम्बपेक्षाही खतरनाक बनले आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा व्हायरस त्याला शोधणाऱ्या डॉक्टरलाही संपवून बसला आहे. जगभरात या व्हायरसने 3000 हून जास्त बळी घेतले आहेत. तर 1 लाख लोक संक्रमित झाले आहेत.

आजपर्यंत अनेक बातम्या, व्हीडिओंमध्ये तुम्ही गुलाबी, जांभळ्या अशा वेगवेगळ्या आकारात फोटो पाहिले असतील. आणि हा व्हायरस तसाच दिसत असेल असे तुम्हाला वाटले असेल. पण ते सारे कल्पित फोटो होते. कोरोना व्हायरसचा एकदम खराखुरा फोटो जारी करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस हा खूप खतरनाक आहे. म्हणजे वाहत्या हवेबरोबरही तो उडून जातो. यामुळे तो मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.

कोरोना व्हायरस हवेबरोबर जातो खरा पण तो काही काळच जिवंत राहू शकतो. म्हणजे केवळ 2 मीटर अंतरच तो हवेमध्ये जगू शकतो. यामुळे चीनहून येणाऱ्या हवेमुळे लगतच्या भारतीय भागात हा व्हायरस पसरण्याची शक्यता नाही.

कोरोनाचे कर्मचारी आढळल्याने पेटीएम, फेसबूक, कॉग्निझंटसारख्या कंपन्यांनी त्यांची कार्यालये बंद ठेवली आहेत. तर स्थानिक पातळीवरील आरोग्य अधिकारी परदेशातून आलेल्या लोकांना शोधून काढत आहेत.

चीनी लष्कराच्या वैद्यकीय विभागाच्या मेजर जनरलने कोरोनावरील लस शोधून काढली आहे. ही लस लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादित करून ती रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

जगभरात दहशत पसरलेली असताना चीनच्याच वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसचा फोटो काढला आहे.

शेनझेन थर्ड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

फ्रोजन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अ‍ॅनलिसिस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोनाचं छायाचित्र घेण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वप्रथम विषाणूला निष्क्रीय करण्यात आलं. त्यानंतर त्याचं छायाचित्र टिपण्यात आलं.

चीनच्या वुहानमध्ये हा व्हायरस जन्माला आला होता. चीननेच जैविक युद्धासाठी या व्हायरसची निर्मिती केल्याचा आरोप होत होता.