CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 24 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:56 PM2021-10-23T16:56:10+5:302021-10-23T17:08:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 243,851,799 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत 4,955,454 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जॉन हापकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोट्यवधी लोकांचं लसीकरण झालं आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहेत. अमेरिकेसारखा प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला आहे.

अमेरिकेत कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. अमेरिकेत संसर्ग झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे तर साथीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत या प्राणघातक व्हायरसचा कहर वाढला असून लहान मुलांना अधिक धोका आहे.

जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र तरी देखील मृतांचा आकड्याने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचं नवनवीन रुप समोर येत असल्याने धोका आणखी वाढला आहे.

भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा केला असून चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असला तरी काही देशांमध्ये अद्यापही भीषण परिस्थिती आहे.

सीएसएसईच्या आकडेवारीनुसार 30 लाखांहून अधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये ब्राजील (21,711,843), यूके (8,730,715), रशिया (8,041,581), तुर्की (7,800,766), फ्रान्स (7,215,584), इराण (5,844,589), अर्जेंटीना (5,278,910), स्पेन (4,997,732), इटली (4,733,557), इंडोनेशिया (4,238,594), जर्मनी (4,452,547) आणि मेक्सिको (3,777,209) चा समावेश आहे.

ब्राजील (605,139), भारत (453,042), मेक्सिको (285,953), रशिया (224,369), पेरू (200,003), इंडोनेशिया (143,153), यूके (139,742), इटली (131,763), कोलंबिया (126,994), इराण (124,928), फ्रान्स (118,373) आणि अर्जेंटीना (115,819) या देशांत कोरोनामुळे अधिक मृत्यू झाले आहेत.

कोरोनावर लाखो लोकांनी मात केली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत.

फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

फ्रान्समध्ये 24 तासांमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या ही आता 15 वरून थेट 6,483 इतकी झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये 33 हजार 497 कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सध्याच्या आकडेवारीशी तुलना करता रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांच्या तुलनेत ही संख्या पाचपटीने कमी आहे. मात्र तरी देखील फ्रान्समध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5,934 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील एका आठवड्याच्या तुलनेत सातत्याने मोठी वाढ होत आहे. फेब्रुवारीत कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.