Mission Successful! अत्यंत धोकादायक 'बेनू'चे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरलं 'कॅप्सूल'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:45 AM2023-09-25T09:45:01+5:302023-09-25T09:52:01+5:30

२४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री साडे आठ वाजता अमेरिकेच्या उटाह येथील ग्रेट सॉल्ट लेक रेगिस्तानमध्ये अंतराळातून एक कॅप्सूल आले आहे. या कॅप्सूलमध्ये त्या उल्कापिंडचे नमुने आहेत जे १५९ वर्षापूर्वी म्हणजे २४ सप्टेंबर २१८२ मध्ये पृथ्वीला धडकलं होते. त्या उल्कापिंडचे नाव बेनू(Bennu) आहे. हे यान ६४३ कोटी किलोमीटर प्रवास करून आले आहे.

या उल्कापिंडाच्या टक्करमध्ये २२ अणू बॉम्बच्या स्फोटाएवढी शक्ती असल्याचे म्हटलं जाते. यापासून वाचण्यासाठी नासाने OSIRIS-ReX मिशन लॉन्च केले होते. जेणेकरून या उल्कापिंडाच्या नमुने तपासले जातील.

हे उल्कापिंड किती ताकदीचे आहे, जेणेकरून मिसाईलनेच अंतराळात हे उडवले जाऊ शकते. अथवा या उल्कापिंडाचे दिशा बदलण्यासाठी कुठले यान अथवा शस्त्र अंतराळात पाठवण्याची गरज भासेल याचा शोध घेतला जाणार आहे.

कॅप्सूल ग्रेट सॉल्ट लेक रेगिस्तानमध्ये उतरलं आहे. आता यात आणलेल्या उल्कापिंडचे नमुने तपासले जातील. हे कॅप्सूल छोट्या फ्रिजच्या आकाराचा आहे. ओसाइरिस रेक्स म्हणजे OSIRI ReX चं पूर्ण नाव ओरिजिंस, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन अँन्ड सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर असं आहे.

हे अमेरिकेचे पहिले मिशन आहे. ज्याला उल्कापिंडचे नमुने आणण्यासाठी पाठवले होते. या यानाने ३ वर्षापूर्वी Bennu चे नमुने जमा केले होते. तेव्हापासून त्याचा पृथ्वीच्या दिशेचा प्रवास सुरू होता. ४५ किलो वजनाच्या या कॅप्सूलमध्ये २५० ग्रॅम नमुने आहेत. सौरमंडळात प्रवेश करताच त्याने लाव्हापेक्षा दुप्पट तपमान सहन केले आहे.

पृथ्वीच्या वातावरणात ज्या वेगाने प्रवेश केला ते आश्चर्यकारक आहे. मानवनिर्मित ही कॅप्सूल वातावरणात प्रवेश करणारी दुसरी सर्वात वेगवान वस्तू आहे. अंतराळात हायपरसोनिक वेगाने प्रवास करत ती पृथ्वीवर पोहचली. त्यात हीटशील्ड लावण्यात आले होते. जेणेकरून सौरमंडळातील उच्च तापमानापासून त्याचे संरक्षण होईल.

पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना त्याचा वेग ३६ पटीने वाढला होता. परंतु लँडिंगवेळी १० प्रतितास वेग झाला. म्हणजे पॅराशूटच्या माध्यमातून १६ किलोमीटर प्रतितास वेग होता. नासाची रिकवरी टीम हेलिकॉप्टर आणि ट्रक घेऊन रेगिस्तानला रवाना झाली. ज्याठिकाणी याचे लँडिंग होणार होते.

ग्रेट सॉल्ट लेक रेगिस्तान अतिउष्णता आणि मीठ लागवडीसाठी ओळखले जाते. नासाचे वैज्ञानिक आणि हवामान तज्ज्ञ सातत्याने या कॅप्सूलच्या प्रवासावर लक्ष ठेवून होते. या यानाला बेनू उल्कापिंडच्या अभ्यासासाठी ७ वर्षापूर्वी लॉन्च करण्यात आले होते.

नमुने घेऊन परतलेल्या नासाच्या कॅप्सूल OSIRIS-ReX चे प्रोजेक्ट मॅनेजर रिर्च बॅन्सने सांगितले की, आम्ही सात वर्षापूर्वी बेनू उल्कापिंडाचे नमुने आणण्यासाठी पाठवले होते. बेनूला धडक दिल्यानंतर जे नुकसान होईल ते अत्यंत भीषण असेल ही वेगळी बाब होती असं त्यांनी सांगितले.

पृथ्वीवरून डायनासोर नष्ट करणाऱ्या उल्कापेक्षा बेन्नू २० पट कमी रुंद आहे. परंतु जर हे धडकलं तर मोठा विध्वंस होऊ शकतो. जमीन असो वा समुद्रात हे धडकलं तर जगातील अनेक जीव संपुष्टात येऊ शकतात. याच्या टक्करने १० किमीवर खड्डा पडू शकतो. त्यामुळे जिथे हे धडकेल तिथून १००० किमी अंतरावर काहीच वाचणार नाही. आणि समुद्रात हे पडले तर त्यातून सुनामी येऊन अनेक देशात मोठं नुकसान होऊ शकतो.

टॅग्स :नासाNASA