आशिया हॉकी कप - भारताकडून पाकचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 00:18 IST2017-10-16T00:14:09+5:302017-10-16T00:18:02+5:30

भारतीय पुरूष हॉकी संघाने पाकिस्तान संघाला धूळ चारत आशिया चषक हॉकी स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे.

भारताने पूल एच्या आपल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानवर ३-१ अशी मात केली.

भारताकडून चिंगलेनसाना सिंह, रमनदीप सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी गोल केले.

भारतीय संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये अनेक संधी निर्माण केल्या. मात्र भारतीय संघाला पाकिस्तानचे संरक्षक कडे भेदता आले नाही.

पाकिस्तानने तीन सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकत ४ अंकांसह सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. तर, जपानने देखील इतकेच अंक कमावले आहेत.