सावधान! डोकं दुखतंय, बोलताना अडचण जाणवतेय?; ब्रेन स्ट्रोकची ‘ही’ आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 19:46 IST2022-10-29T19:36:38+5:302022-10-29T19:46:07+5:30
World Stroke Day 2022 : दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो.

स्ट्रोक हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण झालं आहे. हा एक धोकादायक आजार आहे ज्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या भयंकर आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. World Brain Stroke ला जागतिक स्ट्रोक दिवस 2022 असेही म्हणतात.
डॉ. खुशबू गोयल, सल्लागार, न्यूरोलॉजी विभाग, एचसीएमसीटी मणिपाल हॉस्पिटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक्सच्या स्वरूपात फॅट जमा होते. यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा पूर्णपणे बंद होतो. हे रक्तातील ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह अवरोधित करते. ज्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरतात.
मिनीस्ट्रोक म्हणजे काय?
मेंदूतील रक्तस्त्राव काही प्रकरणांमध्ये स्ट्रोक देखील होऊ शकतो. जेव्हा नुकसान खूप मोठे असते. स्ट्रोकचे दोन स्तर आहेत - मिनिस्ट्रोक आणि स्ट्रोक. एक मिनी-स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा नुकसान फक्त काही मिनिटे टिकते आणि मेंदूवर कायमस्वरूपी प्रभाव टाकत नाही. त्याची लक्षणे इतर स्ट्रोक सारखीच असतात.
अनेकदा येऊ घातलेल्या मोठ्या स्ट्रोकची चेतावणी म्हणून घेतली जातात. स्ट्रोकमुळे मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते आणि दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. म्हणून, स्ट्रोकच्या सर्व लक्षणांबद्दल जागरूक असणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
शरीराचा काही भाग सुन्न होतो
स्ट्रोकचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर किंवा पायांवर अर्धवट अर्धांगवायूचा अनुभव येऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये ते शरीराच्या एका बाजूला दिसून येते. हे ओळखण्यासाठी, रुग्णाला त्याचा/तिचा हात/पाय वर करण्यास सांगितले जाते.
बोलण्यात आणि समजण्यात अडचण
व्यक्तीचा अचानक गोंधळ होतो किंवा समजण्यात अडचण येते, जे येऊ घातलेल्या स्ट्रोकचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. लक्षणं समजण्यासाठी एक छोटी चाचणी करा. अचानक वाक्ये बोलू न शकल्यामुळे आणि संवाद साधता न आल्याने रुग्णाला मदतीची गरज भासू शकते.
दृष्टी कमी होणे
अचानक आंशिक किंवा पूर्ण दृष्टी कमी होणे हे आणखी एक लक्षण आहे. हे एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये होऊ शकते. स्ट्रोकच्या काही प्रकरणांमध्ये, रुग्णाची दृष्टी येऊ शकते आणि जाऊ शकते. रेटिनल आर्टरी ऑक्यूशनमुळे डोळ्यात रक्ताची गुठळी तयार होते, ज्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. हे स्ट्रोकमुळे देखील होते.
समतोल बिघडणे
मेंदूला हानी झाल्यावर चक्कर येणे, असंतुलन आणि समन्वय कमी होणे होऊ शकतं. त्यामुळे रुग्णाला चालणे, बसणे, हालचाल करणे कठीण होते.
तीव्र डोकेदुखी
अज्ञात कारणाशिवाय असह्य डोकेदुखी हे एक महत्त्वाचे लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. स्ट्रोकनंतर वैद्यकीय तज्ञांचा वेळेवर सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मिनी-स्ट्रोक आणि त्यांच्या लक्षणांना हलक्यात घेऊ नका. स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.