30 years later woman opened mouth : तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:15 PM2021-03-30T13:15:15+5:302021-03-30T13:44:59+5:30

30 years later woman opened mouth : ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. या ऑपरेशनदरम्यान छोटिशी चूक खूप महागात पडली असती.

दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकमध्ये सिनियर मॅनेजरच्या पदावर काम करत असलेल्या एका महिलेचे अनोखे ऑपरेशन झाले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण गेल्या ३० वर्षांपासून या महिलेचं तोंड बंद होतं. एका गंभीर ऑपरेशननंतर या महिलेचं तोंड उघडण्यात आलं. दीड महिन्यापूर्वी ३० वर्षांच्या आस्था मोंगिया यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयात प्लास्टीक सर्जरी विभागात उपचार करण्यात आले.

ही महिला जन्मजात एका आजारानं ग्रासलेली होती. या महिलेच्या जबड्याची हाडं तोंडाच्या दोन्ही बाजूला मेंदूच्या हाडांसह जोडली गेली होती. त्यामुळे ही महिला आपलं तोंड उघडू शकत नव्हती. याशिवाय ही महिला आपल्या बोटानं जीभेला स्पर्शही करू शकत नव्हती. फक्त द्रव पदार्थांवर ही महिला जीवंत होती.

तोंड उघडू शकत नसल्यामुळे या महिलेच्या दातांवर इफेक्शन झालं होतं आणि फक्त एका डोळ्यानं पाहू शकत होती. ट्यूमरमुळे या महिलेच्या नसा रक्तानं भरलेल्या होत्या. यामुळे कोणतंही रुग्णालय सर्जरी करून घेण्यास तयार नव्हतं. परिवार भारत, युनायडेट किंगडम आणि दुबईच्या मोठ्या रुग्णालयातही या महिलेची केस कोणीही हाती घेतली नव्हती.

सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टर राजीव अहूजा यांनी सांगितले की, ''जेव्हा आम्ही रुग्णाला पाहिले तेव्हा सर्जरी खूप रिस्की वाटत होती. जास्त रक्तस्त्राव झाल्यास ऑपरेशन टेबलवरच मृत्यू होण्याची शक्यता होती. नंतर आम्ही प्लास्टीक सर्जरी, वॅस्कूलर सर्जरी आणि रेडिओलॉजी विभागाच्या टिमला बोलावून घेतले. चर्चा केल्यानंतर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ''

या सर्जरीत डॉक्टर रमन शर्मा आणि डॉक्टर इतिश्री गुप्ता, डॉक्टर अंबरिश सात्विक आणि डॉक्टर जयश्री सुज, डॉक्टर अमिताभ यांचा सहभाग होता.

ऑपरेशनच्या ३ आठवडे आधी रुग्णाच्या तोंडाला एक खास इंजेक्शन लावण्यात आलं होतं. ज्यामुळे रक्तानं भरलेल्या आंकुचन पावतात. २० मार्च २०२१ ला रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. या ऑपरेशनदरम्यान छोटिशी चूक खूप महागात पडली असती.

ऑपरेशन टेबलवर या महिला रुग्णाचे तोंड अडीच सेंटीमीटरपर्यंत उघडे झाले होते. २५ मार्च २०२१ ला जेव्हा आस्था रुग्णालयातून बाहेर आली तेव्हा तिचे तोंड ३ सेंटीमीटर उघडले होते. सामान्य व्यक्तीचे तोंड ४ ते ६ सेंटीमीटरपर्यंत उघडते. डॉक्टर राजीव अहूजा यांनी सांगितले की, तोंडाची फिजीओथेरेपी आणि व्यायाम केल्यानं या महिलेचं तोंड जास्त उघडण्यास मदत होईल.

या महिलेचे वडिल पुष्क मोंगिया यांनी सांगितले की, ''माझ्या मुलीनं गेल्या ३० वर्षात खूप कष्ट सहन केले आहेत. ती आपल्या जीभेला हातसुद्धा लावू शकत नव्हती. एवढ्या वर्षांनी आता ती तोंड उघडू शकत आहे. आता ती सामान्य लोकांप्रमाणे तोंड उघडू शकते.''

३० वर्षांना आपलं तोंड उघडत असलेल्या आस्था मोगिंया या डॉक्टरांना म्हणाल्या की, ''पुन्हा एकदा मला जन्म दिल्याबद्दल मी डॉक्टरांची आभारी आहे.''

Read in English