संजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 02:36 PM2019-08-19T14:36:58+5:302019-08-19T14:52:42+5:30

निसर्गामध्ये आढळणारी प्रत्येक गोष्ट ही काही खास गुणवैशिष्ट्ये धारण करून असते. जंंगलांमधील अनेक वनस्पतींचा औषधी उपयोग होत असतो. आज आपण जाणून घेऊयात निसर्गामध्ये आढळणाऱ्या अत्यंत गुणकारी अशा सात वनस्पतींविषयी.

जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियावरील इलाज म्हणून आपल्या यादीत ज्या औषधांचा समावेश केला आहे त्यात कुनैनला स्थान देण्यात आले आहे. या वनस्पतीचा मलेरियावर औषध म्हणून दीर्घकाळापर्यंत वापर झाला होता.

युरोप आणि पश्चिम युरोपच्या काही भागात आढळणारी पिवळी काऊस्लिपची फुले ही अस्थमा आणि ब्राँकायटीसवरील आजारांमध्ये गुणकारी ठरतात.

दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या खोऱ्यात आढळणारी गुआराना वेलीची फळे ही पोटासंबंधीच्या समस्यांवर इलाज म्हणून वापरली जातात.

आफ्रिकन चेरी ही मलेरिया, पोट आणि किडणीच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. तसेच प्रेटेस्ट कॅन्सरवरील उपचारामध्येही ही उपयुक्त ठरते.

जिंनसेंग ही सर्वात अधिक वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. थकवा दूर करण्यासाठी ती उपयुक्त ठरते.

भारतात आढळणारे हे गवत विविध पारंपरिक औषधांमध्ये वापरतात. तसेच त्याचा पशुखाद्य म्हणूनही वापर होतो.

डेंडेलाइन ही वनस्पती प्रोटीन आणि खनिजांनी समृद्ध असते. हिच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते.