दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:30 IST2024-10-01T16:08:24+5:302024-10-01T16:30:56+5:30
तुम्हाला माहीत आहे का की चहामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच तुम्हाला एका भयंकर आजाराचा सामना करावा लागू शकतो.

चहा प्यायला सर्वांनाच आवडतो. सकाळ असो, संध्याकाळ असो वा पाऊस, वाफाळलेला चहा आणि कुटुंबीय किंवा नातेवाईकांसोबत गप्पा मारण्यात एक वेगळीच मजा येते.
अनेकांना चहाचं व्यसन असतं आणि दिवसभरात कधीही चहा मिळाला तर ते त्याला नाही म्हणू शकत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का की चहामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच तुम्हाला एका भयंकर आजाराचा सामना करावा लागू शकतो.
ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ICMR आणि NIN (National Institute of Nutrition) यांनी मिळून त्यांची आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे काही दिवसांपूर्वी जारी केली होती.
ज्यामध्ये चहा आणि कॉफीवरही महत्त्वाची चर्चा करण्यात आली होती. त्यांच्या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
ICMR ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दुधाचा चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याशिवाय तुम्ही दुधाशिवाय चहा घेऊ शकता. दुधाशिवाय चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
असं केल्यास ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. याशिवाय अशा प्रकारच्या चहाचं सेवन केल्याने कोरोनरी आर्टरी डिसीज आणि पोटाच्या कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. चहा आणि कॉफीच्या बाबतीतही तेच आहे. वास्तविक, चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन आढळते ज्यामुळे शरीरातील लोह शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि व्यक्ती ॲनिमियाचा शिकार होऊ शकतो. याशिवाय चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळे रक्तदाब वाढून हृदयविकार वाढू शकतात.
जास्त प्रमाणात चहा-कॉफी प्यायल्याने पोट फुगणे, बद्धकोष्ठता, डिहायड्रेशन, निद्रानाश, पचन, डोकेदुखी आणि तणाव यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
ICMR मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या व्यक्तीने फक्त ३०० mg कॅफिनचं सेवन केलं पाहिजे. चहा-कॉफीचं अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकतं.