गरजेपेक्षा जास्त झोपणे हानिकारक, 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:37 PM2024-04-16T16:37:41+5:302024-04-16T16:53:06+5:30

Health Tips: तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त झोप घेत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

शरीरात जेव्हा व्हिटॅमिनची कमतरता असते, तेव्हा अशक्तपणा, थकवा, गरजेपेक्षा जास्त झोप अशी ही सर्व लक्षणे उद्भवतात.

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जास्त झोप आणि थकवा येतो.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोपेच्या तक्रारी असू शकतात. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेते.

या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात वेदना होण्याची तक्रार असते. तसेच, मेटाबॉलिज्म कमी होऊ लागते आणि रोग प्रतिकारशक्ती देखील हळूहळू कमकुवत होते.

व्हिटॅमिन डीमुळे अंगदुधी, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून सोयाबीन, दही, दूध, चीज, ओट्स, दलिया आणि अंडी यांचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे जास्त झोप लागण्याची तक्रार असते. त्यामुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो.