सावधान! उशिरा उठण्याची सवय असेल तर लगेचच बदला अन्यथा बसेल फटका, 'या' आजारांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 17:13 IST2024-02-27T16:39:01+5:302024-02-27T17:13:05+5:30
जास्त वेळ झोपल्याने तुमचं शरीर अनेक आजारांना बळी पडू शकतं. याविषयी जाणून घेऊया...

सकाळी लवकर उठण्याचा अनेकदा सल्ला दिला जातो. आजची जीवनशैली आणि रोजचीच धावपळ यामुळे हे करणे अनेकांसाठी सोपं नसतं. लोकांचा दिनक्रम हा थोडा बदलला आहे. बरेच लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात.
सकाळी लवकर उठण्याची सवय करा. कारण जर तसं केलं नाही तर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याचे दुष्परिणाम आहेत. जास्त वेळ झोपल्याने तुमचं शरीर अनेक आजारांना बळी पडू शकतं. याविषयी जाणून घेऊया...
मानसिक आरोग्य बिघडेल
जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो असं समोर आलं आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असे करणाऱ्यांमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य आणि मूड स्विंग यांसारख्या समस्या वाढू शकतात, ज्याचे पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात.
पचनाशी संबंधित समस्या
जास्त वेळ झोपल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे शरीर अत्यंत हळू काम करतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
उशिरापर्यंत झोपणाऱ्यांना मुळव्याधाचा देखील त्रास होऊ शकतो.
हृदयासंबंधित आजार
जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही आणि शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं.
ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळीही यामुळे वाढू शकते. तसेच हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
लठ्ठपणा
ज्या लोकांना जास्त वेळ झोपण्याची आणि उशिरा उठण्याची सवय असते, त्यांचा मेटाबॉलिक रेट खूपच कमी असतो.
काहीही खाल्ल्यानंतर कॅलरी बर्न होण्यास त्रास होतो. शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.
मधुमेह
हाय ब्लड प्रेशरची समस्या दिसून येते, ज्यामुळे त्यांना मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती उशिरा उठते तेव्हा त्याची साखरेची पातळी खूपच कमी होऊ शकते.
भूकेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आहारातील असंतुलन मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. आरोग्यविषयक काहीही समस्या आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.