एक्सरसाइज आणि डाएटिंग शक्य नसेल तर, 'या' टिप्स वापरून कमी करा वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:42 PM2019-10-18T12:42:22+5:302019-10-18T12:50:55+5:30

फिट राहण्यासाठी आपण वाटेल तो उपाय करण्यासाठी तयार असतो. मग ते डायटिंग असो किंवा तासन्तास जिममधील वर्कआउट असो. सगळे उपाय करून अगदी कंटाळा येतो पण अनेकदा पदरी पडते ती निराशाच. अशातच आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील.

आपल्यापैकी अनेक लोक वेगवेगळ्या डाएट ट्रिप्स फॉलो करतात आणि अनेक पदार्थ खाणं टाळतात. पण तरिसुद्धा वजन काही कमी होत नाही. टेन्शन नका घेऊ. काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला वजन कमी करून फिट राहण्यासाठी मदत करतील.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सर्वात आधी जेवणात तेलाचा वापर कमी करा. तेलाऐवजी इतर हेल्दी पदार्थांचा वापर करू शकता. एक चमचा तूपामध्ये 135 कॅलरी असतात. वजन कमी करण्यासाठी 1200 कॅलरी दररोज बॅलेन्स करणं आवश्यक असतं.

आपल्या घरात प्रामुख्याने पांढऱ्या तांदळाचा भात तयार केला जातो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही भात खाणं बदं करा. घाबरू नका.... अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राइस निवडू शकता. अर्ध्या कपामध्ये 133 कॅलरी असतात. तर व्हाइट राइसमध्ये 266 कॅलरी होत्या, ब्राउन राइसमुळे तुमचं पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं. तसेच पांढऱ्या तांदळ्याच्या तुलनेमध्ये याची ग्लायसीमिक इंडेक्स फार कमी असते.

दुसरी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी स्वतःला काही पदार्थ खाण्यापासून रोखत असाल आणि एखाद्या दिवशी खाण्याची इच्छा झाली म्हणून खाण्याचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. कारण अशावेळी तुम्ही जास्त सेवन करता. असं केल्याने तुमच्या पूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकतं. त्यामुळे तुमच्या आहारावर लक्ष ठेवा.

परफेक्ट फिगरसाठी ब्रेकफास्ट करणं सोडण्याचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. यामुळे पोटात गॅस होण्याची आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. हेल्दी ब्रेकफास्ट करा. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पोषण मिळेल. ओटमील चांगला आणि हेल्दी ब्रेकफास्ट आहे. यामुळे तुम्हाला लवकर भूक नाही लागणार.

दिवसातून दोन किंवा तीन वेळा आहार घेण्याऐवजी थोडा थोडा आहार सहा वेळा घ्या. स्नॅक्स खाणं अजिबात बंद करू नका. फक्त फ्राय करण्याऐवजी बेक करून खा.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)