पायऱ्या चढण्याच्या टेस्टने जाणून घ्या किती फिट आहे तुमचं हृदय, रिसर्चमधून आश्चर्यकारक माहिती समोर....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 09:27 AM2020-12-26T09:27:06+5:302020-12-26T09:37:56+5:30

हा रिसर्च यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या वैज्ञानिकांनी एका बैठकीत सादर केला. या बैठकीत लॅबमध्ये केली जाणारी एक्सरसाइज टेस्टिंगची तुलना स्टेअर्स टेस्टसोबत केली गेली.

तुमचं हृदय किती फिट आणि निरोगी आहे हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता. स्पेनच्या अभ्यासकांचं मत आहे की, पायऱ्या चढून तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जाणून घेऊ शकता. अभ्यासकांनी सांगितले की, जर तुम्ही १ मिनिटाच्या आत ६० पायऱ्या चढत असाल तर याचा अर्थ हा आहे की, तुमचं हृदय पूर्णपणे निरोगी आणि फिट आहे.

स्पेनच्या यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि या रिसर्चचे लेखक डॉक्टर जीसस पेटेइरो यांनी हेल्थलाइन वेबसाइटला सांगितले की, 'स्टेअर्स(पायऱ्या) टेस्ट हृदयाचं आरोग्य जाणून घेण्याची एक सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला ६० पायऱ्या चढायला दीड मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमचं हृदय पूर्णपणे फिट नाही आणि तुम्हाला डॉक्टरांना सल्ला घेणं गरजेचं आहे'.

हा रिसर्च यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या वैज्ञानिकांनी एका बैठकीत सादर केला. या बैठकीत लॅबमध्ये केली जाणारी एक्सरसाइज टेस्टिंगची तुलना स्टेअर्स टेस्टसोबत केली गेली.

१६५ लोकांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये मेटाबॉलिक इक्विवेलंट मोजण्यासाठी आधी लोकांना त्यांच्या एक्सरसाइज क्षमतेनुसार, ट्रेडमिलवर त्यांना थकवा येईपर्यंत चालण्यास सांगण्यात आले. त्यानंतर थोडा आराम करून त्यांना वेगाने ६० पायऱ्या चढायला सांगण्यात आलं आणि यांचं मेटाबॉलिक इक्विवेलेंट पुन्हा मोजण्यात आलं'.

४० ते ४५ सेकंदापेक्षाही कमी वेळात पायऱ्या चढणाऱ्या लोकांचं मेटाबॉलिक इक्विवेलेंट ९ ते १० METs होतं. आधीच्या रिसर्चमध्ये एक्सरसाइज टेस्ट दरम्यान १० METs मिळणाऱ्यांमध्ये मृत्यू दर कमी झाला. लोकांना पायऱ्या चढायला १.५ मिनिटे लागलीत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागला त्यांचं METs ८ पेक्षा आलं.

तेच एक मिनिटापेक्षाही कमी वेळेत पायऱ्या चढणाऱ्या ३२ टक्के लोकांच्या तुलनेत ज्या ५८ टक्के लोकांनी पायऱ्या चढायला १.५ मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ घेतला, एक्सरसाइज दरम्यान त्यांची हृदय कार्यक्षमता अनियमित आढळून आली. पण या रिसर्चवर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकांचं मत आहे की, प्रत्येक ३ पैकी १ रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, ज्या सहभागी लोकांनी लवकर पायऱ्या चढल्या त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता पूर्णपणे ठीक आढळून आली. यावरून हे दिसतं की, त्यांना हृदयाचे आजार होऊ शकतात.

न्यू जर्सीच्या महिला हार्ट सेंटरच्या डिरेक्टर आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रेनी बुलॉक सांगतात की, स्टेअर्स टेस्टला व्यापक मूल्यांकनाच्या रूपात पाहिलं जाऊ नये. त्या म्हणाल्या की, 'या रिसर्चच्या आधारावर, पायऱ्या चढण्याच्या क्षमतेवरून एखाद्या फिजिकल फंक्शनची माहिती घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. या आधारे पूर्णपणे हृदयाच्या आरोग्याची माहिती मिळवता येऊ शकत नाही'.