रोज १५ मिनिटे पायी चालण्याचे 'हे' फायदे वाचाल तर लगेच चालणं सुरू कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 04:00 PM2021-09-07T16:00:37+5:302021-09-07T16:11:48+5:30

Fitness Tips : . रोज १५ ते ३० मिनिटे चालून तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. तसेच याने तुमच्या पर्सनॅलिटीमध्येही बदल दिसेल.

तुमच्याकडे रोज १५ ते ३० मिनिटे चालण्याचा वेळ आहे का? जर वेळायचा म्हटला तर काढता येतो. कारण याने होणारे फायदे वाचाल तर हैराण व्हाल. घाम न गाळता किंवा हेवी वर्कआउट न करताही केवळ पायी चालण्याचेही अनेक फायदे आहेत. असं आमचं नाही तर अनेक रिसर्च आणि डॉक्टरचं म्हणणं आहे. रोज १५ ते ३० मिनिटे चालून तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. तसेच याने तुमच्या पर्सनॅलिटीमध्येही बदल दिसेल.

मेंदू राहतो फीट - पायी चालल्याचा चांगला प्रभाव तुम्हाला तुमच्या मेंदूवरही बघायला मिळतो. रिसर्चनुसार, पायी चालल्याने एंडॉर्फिन हार्मोन वाढतात आणि याने स्ट्रेस लेव्हल कमी होते. या हार्मोन्समुळे मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं आणि यानेच अल्झायमर व डिमेंशियाचा धोका कमी राहतो.

वेगाने चालल्याने हृदय होतं आनंदी - अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, रनिंगसारखं वॉक करणंही हृदयासाठी चांगलं राहतं. याने हृदयातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, कोलेस्ट्रॉल कमी होतात आणि ब्लड प्रेशर स्थिर राहतं.

फुप्फुसापर्यंत जाईल जास्त ऑक्सीजन - पायी चालल्याने फुप्फुसं मजबूत होतात. कारण पायी चालल्याने ऑक्सीजन शरीरात जास्त जातं. याने फुप्फुसं चांगली होता. सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही बचाव होतो.

डायबिटीसचा धोका कमी - रिसर्चमधून समोर आलं आहे की जे लोक वॉक करतात त्यांच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण धावणाऱ्यांच्या तुलनेत ६ पटीने जास्त असतं. याने डायबिटीसचा धोकाही कमी होतो.

जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा चांगलं - रोज जर १० हजार स्टेप्स चालले तर शरीरातील अतिरिक्त चरबी घटवली जाऊ शकते. वॉकमुळे शरीराचे मसल्स टोन फिट राहतात. याने मांसपेशी फिट राहतात. वॉक करणं जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा सोपं आणि जास्त फायदेशीर ठरतं.

ज्वॉइंट्स आणि हाडे होतात मजबूत - ३० मिनिटे रोज वॉक केल्याने तुमची हाडं आणि ज्वाइंट्स मजबूत होतात. मजबूत ज्वाइंट्स सोबतच याने जखमा होण्याचा धोकाही कमी होतो. अर्थरायटिस फाउंडेशननुसार वॉकिंगचे फार फायदे आहेत.

बॉडी राहील लवचिक - वाढत्या वयात जास्त एक्सरसाइज करणं कंबरेसाठी नुकसानकारक असतं. पण वक करणं कंबरेचं दुखणं आणि लचक यासाठी फायदेशीर ठरतं. याने शरीराची स्ट्रेंथ तर वाढतेच, सोबतच लवचिकपणाही वाढतो.