शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Drugs Death: ड्रग्जच्या सेवनामुळे थेट मृत्यू, शरीरात असे काय घडते की माणसाचा जीवच जातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:21 IST

1 / 7
मुंबईतील घटनेमुळे ड्रग्ज मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला. कारण ड्रग्जचे अतिसेवन ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे. जेव्हा शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात अमली पदार्थ रक्तात मिसळतात, तेव्हा शरीराच्या महत्त्वाच्या प्रणाली निकामी होऊ लागतात.
2 / 7
ड्रग्जमुळे मृत्यू होण्याचे पहिले कारण म्हणजे श्वसन संस्थेचे निकामी होणे. हो, हे मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. विशेषतः ओपिओइड्स (उदा.मेथिलीनडायऑक्सिमेथॅम्फेटामाइन, हिरॉईन, फेन्टॅनिल) अतिसेवनामुळे.
3 / 7
ड्रग्जचे अतिसेवन केले गेले, तर काय घडते? पहिलं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक 'रेस्पिरेटरी सेंटर' असते जे आपल्याला श्वास घेण्याची सूचना देते. ड्रग्जमुळे या केंद्राची कार्यक्षमता मंदावते.
4 / 7
त्यानंतर श्वास घेण्याचा वेग इतका कमी होतो की, शरीराला आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि शेवटी श्वास घेणे पूर्णपणे थांबते आणि व्यक्तीचा गुदमरून मृत्यू होतो.
5 / 7
कोकेन किंवा मेथॅम्फेटामाइन सारखी उत्तेजक ड्रग्ज हृदयावर प्रचंड ताण निर्माण करतात. त्यांच्यामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढतात. रक्तदाब वेगाने वाढतो आणि हृदयाच्या धमन्या आकुंचन पावू लागतात.
6 / 7
या सगळ्याचा परिणाम म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन हृदय अचानक बंद पडू शकते. ड्रग्जमुळे मेंदूतील रसायनांचे संतुलनही बिघडते.
7 / 7
अति ड्रग्ज सेवनामुळे शरीराचे तापमान अचानक खूप वाढू शकते किंवा मेंदूतील रक्तवाहिन्या फुटू शकतात. मग त्या व्यक्तीला तीव्र झटके येऊ शकतात, 'स्ट्रोक' बसून मेंदू कायमचा निकामी होऊ शकतो. इतकंच नाही तर अतिसेवनामुळे अनेकदा व्यक्ती बेशुद्ध होते. बेशुद्धावस्थेत असताना जर उलट्या झाल्या, तर त्या बाहेर न पडता फुफ्फुसात जाऊ शकतात. फुफ्फुसाचा मार्गच बंद झाला तर त्या व्यक्तीचा गुदमरून मृत्यू होतो.
टॅग्स :Drugsअमली पदार्थHealthआरोग्य