सावधान! हिवाळ्यात पाणी कमी पिणं पडू शकतं महागात, किडनीसहीत 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:04 AM2021-01-25T09:04:03+5:302021-01-25T09:12:28+5:30

डीहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण फार कमी होतं ज्याने मेंदूला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. इलेक्ट्रोलाइट पोटॅशिअम आणि सोडिअमसारखे मिनरल्स हे कोशिकांमध्ये संकेत पाठवण्याचं काम करतात.

हिवाळ्यात लोकांना कमी तहान लागते. पण कमी तहान लागते म्हणून शरीराला पाण्याची गरज कमी आहे असं समजणं महागात पडू शकतं. शरीरात पाणी कमी झालं की, शरीर हळूहळू डीहायड्रेट होऊ लागतं. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, डीहायड्रेशनमुळे शरीराच्या प्रमुख अवयवांवर वाईट प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ डीहायड्रेशनचे शरीरावर किती गंभीर परिणाम होतात.

डीहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण फार कमी होतं ज्याने मेंदूला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. इलेक्ट्रोलाइट पोटॅशिअम आणि सोडिअमसारखे मिनरल्स हे कोशिकांमध्ये संकेत पाठवण्याचं काम करतात. मेयो क्लीनिकनुसार जर तुमचे इलेक्ट्रोलाइट्स फार कमी असतील तर ते कोशिकांना संकेत पाठवण्याचं काम करू शकणार नाही आणि याने मांसपेशींवर तणावासोबतच हार्ट अटॅक येण्याची समस्या होऊ शकते.

जेव्हा शरीरात पाणी कमी होतं तेव्हा कोशिका मेंदूला याचा संकेत पाठवतात की, तुम्हाला तहान लागली आहे. मात्र, डीहायड्रेशनचा प्रभाव मेंदूवर इतरही पद्धतीने पडतो. डीहायड्रेशनचा थेट संबंध मूड आणि परफॉर्मन्सशी आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रीशनच्या मॅगझिननुसार, केवळ २ टक्के डीहायड्रेशनही कामावरून तुमचं मन विचलित करू शकतं. डीहायड्रेशनचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्तीवरही पडतो.

जेव्हा शरीरात पाण्याची लेव्हल कमी होते तेव्हा कोशिका हायपोथॅलेमसला संकेत पाठवतात जो वॅसोप्रेसिन नावाचं हार्मोन रिलीज करतो. याला एंटीडायरेक्टिक हार्मोन असंही म्हटलं जातं. हे हार्मोन किडनीला रक्तातून कमी पाणी काढण्याचा संकेत देतो. ज्याने लघवी कमी, घट्ट आणि गर्द रंगाची येते.

किडनी रक्ताचं प्रमुख फिल्टर आहे आणि योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने ती शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. डॉक्टर बुश म्हणाले की, 'आश्चर्यकारकपणे तुमची किडनी एका दिवसात ५५ गॅलन पर्यंत तरल पदार्थ घेऊन जाण्यास सक्षम आहे'.

जास्त तहानलेले राहिल्याने किडनीला जास्त मेहनत करावी लागते. नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, असं झालं तर किडनीला इजा होऊ शकते आणि तुम्हाला किडनीची समस्या होऊ शकते. शरीरात पाणी झाल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. मेयो क्लीनिकनुसार, जे लोक उष्ण, शुष्क वातावरणात राहतात आणि ज्या लोकांना इतरांच्या तुलनेत अधिक घाम येतो त्या लोकांमध्ये हा धोका अधिक आढळतो.

शरीरात रक्त तयार करण्यासाठी तरल पदार्थांची गरज असते. जेव्हा शरीरात तरल पदार्थ कमी होतात तेव्हा रक्ताचं प्रमाणही कमी होतं. प्रसिद्ध डायटिशिअन स्टेफन्स्की म्हणाले की, 'शरीरात योग्य प्रमाणात ब्लड प्रेशर कामय ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते'. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे हायपोटेंशन किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो.

यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, डिहायड्रेशनच्या गंभीर स्थितीमुळे हायपोवॉल्मिक शॉकसारखी गंभीर स्थितीही निर्माण होऊ शकते. ज्यात रक्तात ऑक्सीजन कमतरता होऊ लागते आणि रक्ताच्या कमतरतेमुळे ते पूर्ण शरीरात पसरत नाही. ज्यामुळे अवयव काम करणं बंद करू शकतात. डॉक्टर बुश सांगतात की, याच कारणामुळे डोकेदुखी, चक्कर, डोळ्यांवर दबाव, सेक्स ड्राइवमध्ये कमतरता किंवा झोप न येणे यांसारख्या समस्या होतात.

पचन तंत्राला योग्य प्रमाणात पाण्याची गरज पडत असते. पाण्याच्या माध्यमातून शरीरातून न पचणारे पदार्थ बाहेर येतात आणि पचन तंत्र व्यवस्थित राहतं. स्टेफन्स्की म्हणतात की, 'शरीरात तरल पदार्थांच्या कमतरतेचा प्रभाव शौच क्रियेवरही पडतो'.

शरीरात पाणी कमी असेल तर याचा प्रभाव थेट आपल्या त्वचेवरही पडतो. पाण्याची कमतरता असेल तर त्वचा कोरडी पडते आणि ओठ कोरडे पडतात. चांगल्या आणि तजेलदार त्वचेसाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.