अखेर कधीपर्यंत येणार कोरोना विषाणूंची लस; जाणून घ्या जगभरातील संशोधनाबाबत महत्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:15 PM2020-06-29T19:15:05+5:302020-06-29T19:38:23+5:30

कोरोना व्हायरसशी संपूर्ण देश लढत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या माहामारीतून बाहेर येण्यासाठी लस किंवा औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीची एस्ट्राजेनेका कंपनीची लस अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर या लसीकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

जगभरात १४० पेक्षा जास्त लसी वेगवेगळ्या टप्प्यातली परिक्षणात आहेत. कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवणं हेच उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार १६ ग्रुप्सच्या लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. यापैकी पाच चीनमध्ये, तीन अमेरिकेत, युके आणि ऑस्ट्रिलायात एक, जर्मनी आणि रुसमध्येही संशोधन सुरू आहे.

लस तयार करण्याच्या शर्यतीत एक्ट्राजेनका ही लस सगळ्यात पुढे आहे. मोठ्या स्तरावर मानवी परिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

एस्ट्रा-जेनका कंपनीने उत्पादन आणि निर्मीतीसाठी आतापर्यंत १० करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. आता AZD1222 म्हटले जाते. त्याला आधी ChAdOx1 nCoV-19 या रुपाने ओळखले जात होते. कोरोना व्हायसरने जास्त प्रभावित असलेल्या ब्राजीलने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लसीच्या उत्पादनासाठी पुढाकार घेतला आहे.

अमेरिकेतील कंपनी लसीच्या परिक्षणात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही लस कंपनी मॉडर्न इंकद्वारे विकसीत केली जात आहे. mRNA-1273 या लसीचे ट्रायल सुरू केले आहे.

मॉडर्न या औषध तयार करत असलेल्या कंपनीने कॅटलेंट इंकसोबत १० कोटी लसी तयार करण्याचा करार केला आहे. या वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत लस तयार करण्याची सुरूवात होऊ शकते. जुलैमध्ये तीस हजार लोकांवर परिक्षण केले जाणार आहे.

कोरोना लसीच्या पॅकेजिंग, लेबलिंग आणि वितरणाची जबाबदारी कॅटलेंट कंपनीवर असणार आहे. कॅटलेंट कंपनीने एक्ट्रजेनका आणि जॉनसन एंड जॉनसन या कंपन्यांसोबत करार केला आहे. कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करण्यासाठी अधिक ट्रायल सुरू आहे.

सनोफी-ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीसुद्धा लस तयार करण्याासाठी प्रयोग करत आहे. या कंपनीने ब्रिटीश फार्मा कंपनीशी करार केला आहे. या कंपनीने २०२० मध्ये १० कोटी तर २०२१ मध्ये १०० कोटी लसी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

जर्मन फर्म बीएनटेक या कंपनीने कोरोनाची लस तयार करण्यासाठी फार्मास्यूटिकल कंपनी फाइजरशी करार केला आहे. आरएनए तंत्रावर आधारित या कंपनीची लस तयार होणार आहे. ऑक्टोबर २०२० पर्यंत लस तयार होण्याचा दावा या कंपनीने केला आहे.

चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेक कोरोनाची लस तयार करण्यात तिसऱ्या टप्प्यात आहे. पहिल्या दोन परिक्षणात ज्या रुग्णांवर चाचणी करण्यात आली ते. रुग्ण आता सुरक्षित आहेत. चीनी कंपनी CanSino Biologics सुद्धा कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करत आहे.