CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:06 PM2020-07-29T14:06:48+5:302020-07-29T14:21:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याची माहिती मिळत आहे. उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून दिवसागणिक धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 15 लाखांचा टप्पा पार केला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 768 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 34,193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी समोर येत आहेत. एका रिसर्चमधून एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याची माहिती मिळत आहे. उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे.

6 फूट आणि त्यापेक्षा जास्त उंच असलेल्या लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका हा इतर व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

ब्रिटनच्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ओपन युनिव्हर्सिटीसह आंतरराष्ट्रीय रिसर्चर्सच्या एका टीमने याबाबत संशोधन केलं आहे. जवळपास दोन हजार लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला होता.

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकांचं पर्सनल प्रोफाईल, काम आणि घर या गोष्टींचा कोरोनाशी कसा संबंध आहे. याचा अभ्यास देखील या रिसर्चमध्ये प्रामुख्याने करण्यात आला.

कोरोना व्हायरसचा लोकांवर होणारा परिणाम नेमका किती आणि कसा आहे याचा अभ्यास करताना 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे.

फक्त जमिनीवरील ड्रॉपलेट्स नाहीत तर हवेतील ड्रॉपलेट्सही कोरोनाचा प्रसार करतात. मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इवान कॉन्टोपॅन्टेलिस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार हा हवेतून होत असून ड्रॉपलेट्समुळे अधिक लोक संक्रमित होत असल्याचं देखील संशोधकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.

अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची आकडा एक कोटीच्या वर गेला आहे.

जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे

Read in English