CoronaVirus Live Updates : "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित झालेले लोक सर्वात सुरक्षित आहेत का?"; तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:39 PM2022-05-28T17:39:31+5:302022-05-28T17:54:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची तिसरी लाट आल्यापासून भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्ग दिसून येत आहे.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. भारतात आता पुन्हा एकदा गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2685 रुग्ण आढळले आहेत. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

2,158 लोक कोरोनामधून बरे होऊन घरी गेले आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या सततच्या घटनांसोबतच व्हायरसमध्ये म्यूटेशन दिसून येत आहे. हेच कारण आहे ज्यामुळे भारतात ओमायक्रॉन प्रकाराच्या दोन नवीन सब व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.

Omicron च्या नव्या म्युटेशनबद्दलचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा व्हेरिएंट भारतातील लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात का? या संदर्भात दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ एम सी मिश्र यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यापासून भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्ग दिसून येत आहे. यासोबतच असे देखील दिसून आले की, तिसऱ्या लाटेदरम्यान भारतातील बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्या सर्वांमध्ये या व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.

भारतात लसीकरणही चांगले झाले आहे. बहुतेक लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा परिस्थितीत लसीकरणामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्तीही शरीरात असते. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत असे म्हणता येईल की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ज्यांना लसीकरण झाले आहे ते ब-याच प्रमाणात सुरक्षित आहेत.

जर ओमायक्रॉनचे नवे सब व्हेरिएंट आले तर त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकतो परंतु त्यांना गंभीर आजार होणार नाही. डॉ. मिश्र म्हणतात की, संसर्ग आणि कोविड लसीकरणामुळे लोकांमध्ये हायब्रीड किंवा सुपर इम्युनिटी निर्माण झाली आहे, त्यामुळे कोरोनाचा परिणाम आधीच लोकांवर कमी होईल.

फक्त भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये जिथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत, तिथे फक्त ओमायक्रॉनचे व्हेरिएंट समोर येत आहेत. हाच प्रकार भारतातील लोकांच्या बाबतीत घडला आहे.

आता अशा स्थितीत त्यात कितीही म्युटेशन्स आले तरी नवीन सब व्हेरियंट येऊ शकतात, पण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ते कमी धोकादायक असतील. डब्ल्यूएचओ देखील या प्रकारांना चिंताजनक मानत नाही.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नॅशनल चेअर, डॉ. सीजी पंडित, डॉ. आर. आर. गंगाखेडकर सांगतात की, भारतात आतापर्यंत कोणतेही नवीन व्हेरिएंट आढळून आलेले नाहीत, ते सर्व ओमायक्रॉन कुटुंबातील आहेत आणि त्याचे प्रकार आहेत.

Omicron चे BA.1 असो किंवा BA. 2, BA.4 किंवा BA.5. याशिवाय, नुकतेच आलेले XE प्रकार देखील एकाच कुटुंबाचे रिकॉम्बीनेशन आहे जे एक आणि दोनने तयार झाले आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत भारतातील बहुतेक लोकांना ओमाय़क्रॉन प्रकाराची लागण झाली आहे.

ओमाय़क्रॉन कुटुंबातील कोणताही व्हेरिएंट किंवा रीकॉम्बिनंट समोर आले तर इथल्या लोकांना फारसा धोका नाही. याबाबत लोकांना घाबरण्याचीही गरज नाही. मात्र, लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. खबरदारी घ्यावी लागेल. मास्क घाला आणि कोविड नियमांचे पालन करा.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. पण पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.