CoronaVirus : कोरोनाची लस येईपर्यंत बचाव करण्यासाठी 'ही' पध्दत ठरेल प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 10:39 AM2020-04-07T10:39:30+5:302020-04-07T10:59:15+5:30

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे गंभीर परिस्थीतीत निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागण झालेल्यांची आणि मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थीत सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं असलं तरी कोरोना व्हायरसवर लस येणं गरजेचं आहे.

त्यासाठी सगळ्याच देशात कोरोनापासून लोकांना वाचवण्यासाठी लस करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण लस निर्माण होईपर्यंत काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तरच आपला कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.

जर तुम्ही सेल्फ आयसोलेशनमध्ये असाल तर काही गोष्टी करू नका. घरच्या व्यक्तींशी सुद्धा अंतर ठेवून बोला, मार्केट, ग्राऊंड अशा सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा.

आजूबाजूच्या लोकांना तसंच नातेवाईकांना काही दिवस घरी येऊ देऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांनी जेव्हा बाहेर जायला सांगितले आहे. तेव्हाच बाहेर पडा.

सेल्फ आयसोलेशनची गरज या ठराविक लोकांना जास्त गरज असते. कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर स्वतःला वेगळं ठेवा, व्हायरसचं लक्षणं असतील तर कमीतकमी १४ दिवस असतील, अशी लक्षणं दिसत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर १४ दिवस तुम्ही सुद्धा स्वतःला आयसोलेट करा.

१२ आठवडे आयसोलेशनची काही रुग्णांना आवश्यकता असते. पब्लिक हेल्थ ऑफ इंग्लँड यांच्यामते काही गंभीर आणि विशेष परिस्थीतीत लोकांनी कमीतकमी १२ आठवड्यांसाठी स्वतःला आयसोलेट करायला हवं. ज्याचं वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे.

कॅन्सरच्या रुग्णांची जर केमोथेरेपीची औषधं चालू असतील , मागिल सहा महिन्यात स्टेम ट्रांसप्लांट झालं असेल तर, गरोदर महिला असेल तर स्वतःला आयसोलेट करायला हवं

यापासून बचाव करण्यासाठी जर तुमच्या जवळ कुणी शिंकत असेल किंवा खोकत असेल तर घरी आल्यावर सर्वातआधी कपडे बदलावे आणि हे कपडे वेगळे ठेवावे.जर शक्य असेल तर कपडे कोमट पाण्यात भिजवून धुवावे.

घरात कुणी संक्रमित व्यक्ती असेल किंवा कुणाला सर्दी-खोकला झाला असेल तर त्यांचे कपडे इतरांच्या कपड्यांपासून वेगळे ठेवावे.आजारी व्यक्तीचे कपडे धुताना हातात ग्लव्स असावेत. जेणेकरून व्हायरसची लागण होऊ नये.

कुठेही स्पर्श केला तर 20 ते 30 सेकंद चांगले हात धुवावे.