....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 11:04 IST2020-07-16T10:51:04+5:302020-07-16T11:04:41+5:30

जगभरात हाहाकार पसरवत असलेल्या कोरोना विषाणूबाबत अमेरिकेतील सीडीसी CDC (सेंटर्स डिसीज कंट्रोल एंड प्रीवेंशन) ने एक दावा केला आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील लोकांनी जर नियमित स्वरुपात मास्कचा वापर केला तर माहामारी जास्त काळ टिकू शकणार नाही.
एका मुलाखतीदरम्यान सीडीसीचे अध्यक्ष डॉ. रॉबरर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, ''माझ्यामते आत्तापासूनच दररोज मास्कचा वापर करायला सुरूवात केली तर ४, ८ किंवा ६ महिन्यांच्या आत कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.''
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या केसेस अमेरिकेत सगळ्यात जास्त आहेत. अमेरिकेतील तब्बल ३५ लाख लोक या माहामारीचे शिकार झाले आहेत.
CDC आणि WHO या दोन्ही संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मास्कचा वापर केल्यानं कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी होऊ शकतो.
जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीतील तज्ज्ञांच्यामते जगभरात मंगळवारी १ करोड ३० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यातील ५ लाख ७४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक संशोधनातून दावा करण्यात आला आहे की मास्कचा वापर केल्याने ड्रॉपलेट्समुळे होणारं कोरोना संक्रमण आटोक्यात आणता येऊ शकतं.
मागच्या आठवड्यात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हवेतून कोरोना विषाणूंचे संक्रमण पसरतं. यावर तज्ज्ञांचा अधिक रिसर्च सुरू आहे.
. हवेतून जर खरंच कोरोनाचं संक्रमण होत असेल तर संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.