Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:52 PM2021-07-17T19:52:34+5:302021-07-17T20:08:44+5:30

Health Insurance : आरोग्य विमा घेणं हे फायदेशीर असल्याचं मत अनेकांचं आहे. मात्र, तो घेत असताना काही खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा कंपन्यांकडून आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो.

कोरोनामुळे आरोग्य हीच धनसंपदा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आपण बचत करुन पैशांची साठवण करतो, पण दुर्दैवाने आजारपणावेळी रुग्णालयात जमा करावा लागतो.

सध्या बाजारात अनेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांकडून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. कित्येकांनी कोरोना कालवधीत इन्शुरन्समुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत केल्याचीही उदाहरणे आहेत.

आरोग्य विमा घेणं हे फायदेशीर असल्याचं मत अनेकांचं आहे. मात्र, तो घेत असताना काही खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा कंपन्यांकडून आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो.

आजकाल आरोग्य विमा आरोग्य तपासणी केल्याशिवाय देतात. त्याला 'telemedicals' असं म्हणतात. त्यामध्ये, डॉक्टर आपल्याला रेकॉर्डेड कॉलवर सर्व माहिती विचारतात. त्यात खरी माहिती आपण सांगितली पाहिजे!

जर समझा तुम्हाला रक्तदाब (blood pressure) किंवा तणाव (hyper-tension) आहे आणि तुम्ही ते telemedicals मध्ये लपवले. त्यानंतर भविष्यात तुम्ही रुग्णालयात दाखल झालात तर अडचण निर्माण होऊ शकते.

डॉक्टरांना उपचार करतेवेळी खरी माहिती सांगताना तुम्ही रक्तदाब (blood pressure) सांगितले आणि रिपोर्ट्समध्ये देखील ते आले. तर तुम्हाला विमा कंपनी कडून काहीही पैसे मिळणार नाही!

एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे (Diabetes/BP (Critical Illness) असणाऱ्या व्यक्तीला विमा घेतांना जर साधा प्लॅन घेतला तर या आजारांना २ ते ४ वर्षे वेटींग कालावधी असू शकतो.

म्हणजे पहिल्या वर्षी रुग्णालयात भरती झाले आणि त्या मागचे कारण जर (diabetes) आहे तर विमा कंपनी पैसे देत नाही!

म्हणूनच अतिदक्षता आजार जसं की diabetes आणि BP असल्यास असे प्लॅन्स निवडा, ज्यात हे आजार पहिल्या दिवसापासून कव्हर होतात !

अशा प्लॅन्सचा प्रीमियम जास्त असतो पण क्लेम करतांना अडचण होत नाही. त्यामुळे, पुन्हा पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही. तसेच, आपला क्लेमही सहज मंजूर होऊन जातो.

Read in English