Corona Virus : रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होण्याची 'ही' आहेत कारणं, वेळीच व्हा सावध नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 09:39 AM2020-03-13T09:39:03+5:302020-03-13T09:54:17+5:30

इम्यूनिटी आपल्याच काही चुकांमुळे कमजोर होते. अशात जर तुम्हाला कोरोनापासून बचाव करायचा असेल तर इम्युनिटी कमजोर होण्याची कारणे तुम्हाला माहीत असायलाच हवीत.

सध्या कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतात वाढताना दिसत असून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. काही लोक याबाबत जागरूक असून ते आवश्यक ती काळजी घेत आहेत. पण काही लोक याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाची लागण ही इम्यूनिटी म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असलेल्या लोकांना अधिक होते. आणि इम्यूनिटी आपल्याच काही चुकांमुळे कमजोर होते. अशात जर तुम्हाला कोरोनापासून बचाव करायचा असेल तर इम्युनिटी कमजोर होण्याची कारणे तुम्हाला माहीत असायलाच हवीत.

लठ्ठपणा - लठ्ठपणाचा संबंध डायट आणि एक्सरसाइजची कमतरता याच्याशी आहे. याने इम्युनिटी कमजोर होते. लठ्ठपणामुळे अॅंटी-बॉडीजचं निर्माण होऊ शकत नाही आणि रक्तपेशींची संख्याही योग्य प्रमाणात वाढत नाही. ज्यामुळे लठ्ठ लोकांमध्ये संक्रमणापासून लढण्याची क्षमता कमी होते.

एक्सरसाइज न करणे - नियमित एक्सरसाइज करणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. एक्सरसाइज न केल्याने शरीरातील आळश, मांसपेशींमधील तणाव आणि सांधेदुखीची समस्या होऊ लागतात. पुढे जाऊन याने आणखी गंभीर परिणाम दिसतात. रोगप्रतिकारकशक्तीही कमजोर होते. त्यामुळे नियमित एक्सरसाइज करणं गरजेचं आहे.

स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा - सगळीकडे पसरलेले व्हायरस आणि बॅक्टेरिया आपल्यावर हल्ला करण्यासाठी तयार असतात. संक्रमणापासून बचाव करण्यासाठी जेवणाआधी किंवा काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुतले पाहिजे. बेडवरील चादर आणि उशीच्या कव्हर नियमित बदलल्या पाहिजे. तसेच घराची स्वच्छताही नियमित केली पाहिजे.

मद्यसेवन - ज्या लोकांना नियमित मद्यसेवन करण्याची सवय असते त्यांचं शरीर संक्रमणापासून लढण्यास असमर्थ होतं. मद्यसेवननाने रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. आणि वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मद्यसेवन टाळावे.

पुरेशी झोप न घेणे - पुरेशी झोप घेतल्याशिवाय इम्यून सिस्टम आजारांसोबत लढण्यासाठी क्षमता जमवू शकत नाही. इम्युनिटीशी संबंधित सर्वच प्रक्रियांचे संकेत मेंदुशी जुळलेले असतात आणि जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. त्यामुळे रोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

फळं आणि भाज्यांचं सेवन न करणे - इम्यून सिस्टमला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट्ससारखे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सची गरज असते. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, फळं आणि भाज्यांमध्ये असे तत्व असतात ज्याने इम्यून सिस्टम मजबूत होतं.

सकाळचा नाश्ता न करणे - सकाळचा नाश्ता न करण्याची अनेकांची सवय असते. याने आरोग्य तर बिघडतंच सोबतच याचा प्रभाव इम्यूनिटीवरही पडतो. जर तुम्हाला इम्यूनिटी कमजोर होऊ द्यायची नसेल तर नाश्ता नियमित करावा.

खालील उपाय करून तुम्ही मजबूत करा इम्यून सिस्टम

कच्चा लसूण खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणा एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात.

नियमित दह्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सोबतच याने पचनक्रियाची सुरळीत राहण्यात मदत होते. म्हणजे दही खाल्ल्याने तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. सोबतच यात एँटी-मायक्राबिअल गुणही असतात. त्यामुळे रोज ओट्स खाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे.

संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी चं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. लिंबू, आवळा, संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेली फळं खावीत.

हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी मोसमी फळे, दूध यांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुम्हाला शरीरासाठी पोषक तत्व नियमित मिळतील. या पोषक तत्वांमुळेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासही मदत मिळते.

हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.

पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.