पाहा फोटोज - फक्त मनच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त असतं चॉकलेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 06:27 PM2018-01-25T18:27:01+5:302018-01-25T19:39:01+5:30

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच चॉकलेट फार आवडतं. चॉकलेट आवडत नाही अशी मुलगी सापडणं तर तसंही कठीण. पण या चॉकलेट लव्हर्ससाठी एक खुशखबर आहे. चॉकलेट खाणं हे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलं असतं हे फार कमी लोकांना माहित्येय. जाणून घेऊया चॉकलेटचे हे काही फायदे-

१) चॉकलेटचा सुगंध, चव आणि टेक्श्चर मेंदूच्या काही भागात चांगल्या फिलिंग्स निर्माण करते. प्रेमात असताना ज्या भावना मनात असतात तशा भावना चॉकलेट पाहिल्यावर किंवा खाल्ल्यावर निर्माण होतात. त्यात असलेले घटक आपल्याला तणावात जाण्यापासून दूर ठेवतात, असं अभ्यासाक सांगतात.

२) चॉकलेट खाल्ल्याने रक्त पातळ होतं त्यामुळे ब्लॉकेजेस होत नाहीत. कमी रक्तदाबाचा त्रास उद्भवत नाही. चॉकलेटमध्ये असलेले फॅवोनाईड्स नामक केमिकल्स शरीरात नायट्रीक ऑक्साईड निर्मिती करण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तवाहिन्या मोठ्या आणि स्वच्छ होतात.

३) चॉकलेटमधील फ्लॉवोनाईड्स शरीरात बॅड कॉलेस्ट्रोलची निर्मिती होणं थांबवतं. तसंच कोको बटरमध्ये असणारं स्टिअरिक अॅसिड बॅड कॉलेस्ट्रोलची वाढ तर थांबवतंच सोबत गुड कॉलेस्ट्रोलनिर्मितीतही महत्त्वाचं काम करतं.

४) चॉकलेटमध्ये थिओब्रोमाईन नावाचं एक केमिकल असतं जे खोकला कमी करण्यास मदत करतं. चेतासंस्थेद्वारे येणारे संदेश वाहून नेल्यामुळे त्याचा थेट प्रभाव दिसून येतो आणि खोकला जातो.

५) अल्झायमर होण्याचं कारण ठरणाऱ्या अॅमिलॉइड प्लाक्स किंवा चिकट प्रोटीन्स यांच्या निर्मितीत एपिकॅटीकन हा घटक अडकाव घालतो आणि मेंदूचं संरक्षण करतं. ग्रीन टी किंवा कोको बटरमध्ये हा एपिकॅटीकन जास्त प्रमाणात आढळून येतो.