स्पेनचा विक्रमी विजय! प्रशिक्षकाच्या पोरीला पटवलं, संघात स्थान मिळवलं; Ferran Torres नं संधीचं सोनं केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:30 AM2022-11-24T09:30:40+5:302022-11-24T09:34:05+5:30

Fifa World Cup 2022 : माजी वर्ल्ड कप विजेत्या स्पेनने कतार येथे सुरू असलेल्या पहिल्याच सामन्यात ७-० अशा कामगिरीसह कोस्टा रिकाचा धुव्वा उडवला.

माजी वर्ल्ड कप विजेत्या स्पेनने कतार येथे सुरू असलेल्या पहिल्याच सामन्यात ७-० अशा कामगिरीसह कोस्टा रिकाचा धुव्वा उडवला. दानी ओल्मो, गावी, मार्कोस असेन्सियो, कार्लोस सोलेर, अलव्हारो मोराटा यांनी प्रत्येकी एक गोल केला. फेरान टोरेस ( Ferran Torres) याने पदार्पणाच्या सामन्यात दोन गोल करून विक्रम केला.

स्पेनचा ७-० अशा फरकाने कोस्टरिकावर दणदणीत विजय. वर्ल्ड कप स्पर्धेतील हा स्पेनचा सर्वात मोठा विजय ठरला. स्पेनने वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा ५+ गोल केले आहेत. यापूर्वी १९८६ वि. डेन्मार्क ( ५-१) आणि १९९८ वि. बल्गेरिया ( ६-१) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

स्पेनने या संपूर्ण लढतीत त्यांची टिकी टाका स्टाईलनेच खेळ केला आणि वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या हाफ मध्ये ५००+ देणारा स्पेन पहिलाच संघ ठरला. या संपूर्ण सामन्यात स्पेनने १०४५ पास केले, त्याउलट कोस्टा रिकाला २३० पास करता आले.

डॅनी ओल्मो याने स्पेनला ११व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली आणि वर्ल्ड कॉ स्पर्धेतील हा स्पेनचा १०० वा गोल ठरला. जर्मनी, ब्राझील, इटली, अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यानंतर हे शतक साजरे करणारा स्पेन सहावा संघ ठरला.

मार्को असेंनसीओने २१ व्या मिनिटाला स्पेनची आघाडी दुप्पट केली. २०१० च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ( वि. चिले) स्पेनने पहिल्या हाफमध्ये प्रथमच दोन गोल केले

फेरान टोरेसने ३१ व्या मिनिटाला स्पेनला ३-० अशी आघाडी मिळवून दिली आणि १९३४नंतर ( वि. ब्राझील) प्रथमच त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या हाफमध्ये ३ गोल केले आहेत.

फेरान टोरेस हा वर्ल्ड कप पदार्पणात स्पेनकडून दोन गोल करणारा तिसरा खेळाडू ठरला . यापूर्वी डेव्हिड व्हिला वि. उक्रेने, २००६ आणि जोस इरारागोरी एयालो वि. ब्राझील, १९३४ यांनी असा पराक्रम केला होता.

फेरान टोरेसने हे दोन गोल गर्लफ्रेंड सिरा मार्टिनेझसमोर केले आणि विजयानंतर भारी सेलिब्रेशन केलं.

स्पेन संघाचे मुख्य प्रशिक्षक लुईस एनरिक यांची ती मुलगी आहे.

फेरान टोरेसची जेव्हा स्पेनच्या संघात निवड झाली तेव्हा मुलीच्या हट्टापाई ही निवड केल्याची चर्चा रंगली.

त्यात एनरिक यांनीही गंमतीत फेरानला संघात घेतले नसते तर मुलीने मला घरात ठेवले नसते, असे म्हटले होते.