किचनमध्ये काम करताना 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:53 PM2019-04-02T13:53:06+5:302019-04-02T14:01:34+5:30

किचनमध्ये काम करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. कधी कधी स्वयंपाक करताना काही समस्यांचा सामना हा गृहिणींना करावा लागतो. किचनमध्ये काम करताना 'या' टिप्स अत्यंत फायदेशीर ठरतील.

भेंडी ही थोडी गिळगिळीत (चिकट) असल्याने त्याची भाजी तयार करताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाका. भेंडीची भाजी यामुळे गिळगिळीत होणार नाही.

भजी करताना बेसन वापरले जाते. मात्र अनेक त्या भजीसाठी बेसनाचे पीठ तयार करताना ते जास्त पातळ अथवा घट्ट होतं. त्यामुळे ते योग्य प्रणाणात घट्ट झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक कप पाण्यामध्ये तयार केलेल्या बेसनाच्या एक थेंब टाका. जर तो पाण्यावर तरंगत असेल तर तुमचे भजीसाठीचे मिश्रण बरोबर आहे.

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं. त्यामुळे तो कापण्याआधी 10 मिनिटं पाण्यात ठेवा. असे केल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही. तसेच लसूण देखील सोलण्याआधी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा म्हणजेच सोलताना त्याचे साल सहजरित्या निघेल.

दही तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण लवकर दही तयार करायचं असल्यास दूध थोडंस गरम करा. त्यामध्ये 1 टीस्पून दही मिक्स करून झाकण लावा. हे भांड प्रेशर कुकरमध्ये ठेवून बंद करा.

मध शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी मधाचे काही थेंब हे काचेच्या बॉटलमध्ये अथवा ग्लासमध्ये टाका. जर मध तळाशी जमा झाले तर ते शुद्ध आहे. मात्र ते पाण्यात मिसळून गेले तर भेसळयुक्त आहे. मावा शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचा एक गोळा करा. जर तो गोळा फाटला तर तो भेसळयुक्त आहे हे समजा.

कामाच्या घाईत अनेकदा चणे भिजवून ठेवायचं विसरलं जातं. यासाठी पाणी गरम करून त्यात चणे थोडा वेळ उकडवून घ्या. काही वेळानंतर चणे थोडेसे फुगतील आणि भिजवून ठेवल्यासारखे वाटतील.

कोबी आणि फ्लॉवरमध्ये अनेकदा किडे असतात. हे किडे काढण्यासाठी कोबी किंवा फ्लॉवर कापून मीठाच्या पाण्यामध्ये टाका. यामुळे कोबी आणि फ्लॉवरमध्ये किडे असल्यास ते बाहेर येतील.

टॅग्स :अन्नfood