कोण आहे संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव? करिष्माला घटस्फोट देताच तिसऱ्यांदा बांधलेली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:27 IST2025-06-13T12:00:18+5:302025-06-13T12:27:49+5:30
Who is Priya Sachdev, Sunjay Kapur's Wife: प्रिया सचदेवचं हे दुसरं लग्न होतं. तिचा पहिला पती...

अभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्व पती बिझनेसमन संजय कपूर (Sunjay Kapoor) यांचं काल लंडनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. पोलो खेळताना मधमाशी तोंडात गेली आणि त्यांना हार्टअॅटॅक आला असं न्यूज रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
करिष्मा कपूरच्या आधी संजय हे घटस्फोटितच होते. नंदिता महतानी त्यांची पहिली पत्नी होती. २००३ साली त्यांनी करिष्मा कपूरशी लग्न केलं आणि २०१६ साली त्यांचा घटस्फोट झाला.
Who is Priya Sachdev
यानंतर २०१७ साली त्यांनी प्रिया सचदेवशी (Priya Sachdev) लग्न केलं. प्रिया त्यांची तिसरी पत्नी आहे. प्रिया सचदेवचं बॉलिवूडशीही कनेक्शन आहे. प्रिया नक्की काय करते वाचा.
प्रिया सचदेव बिझनेस कुटुंबातून येते. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंट केलं. तिने इन्व्हेस्टमेंट बँकिंग एनालिस्ट म्हणूनही काम केलं.
यानंतर तिने मॉडेलिंग आणि ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवलं. 'नील अँड निक्की' या सिनेमात ती झळकली. ती करिष्माची बहीण करीनासोबत एका जाहिरातीतही दिसली. मात्र तिचं फिल्मी करिअर फारसं चाललं नाही. यानंतर ती विविध फॅमिली बिझनेसकडे वळली.
संजयच्या आधी प्रियाने २००६ साली हॉटेलिस्ट विक्रम चटवालसोबत लग्न केलं होतं. त्यांना सफिरा ही मुलगीही झाली. २०११ साली प्रिया आणि विक्रम यांचा घटस्फोट झाला.
२०१७ साली संजय कपूरसोबत तिने लग्न केलं. २०१८ साली त्यांना एक मुलगा झाला ज्याचं नाव अझारियस आहे.
काही वर्षांपूर्वी संजय कपूर आणि करिष्मा मुलांसाठी एकत्र आले होते. तेव्हा प्रिया सचदेवही होती. त्यांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला होता.