ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 19:51 IST2026-04-11T19:50:28+5:302026-04-11T19:51:38+5:30
प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती शनिवारी बिघडली. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिकची माहिती रुग्णालयाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आशा भोसले यांची प्रकृती शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने बिघडली. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अत्यावश्यक वैद्यकीय कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
#WATCH | Mumbai | Visuals from outside the Breach Candy Hospital, where legendary singer and Padma Vibhushan awardee Asha Bhosle was admitted earlier today. pic.twitter.com/uSwLrwXF4i
— ANI (@ANI) April 11, 2026
आशा भोसले यांची सध्या प्रकृती कशी आहे, याबद्दल अधिकची माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडूनही अद्याप माहिती दिली गेली नाही.