Paridhi Sharma : 'जोधा अकबर'ची जोधा आता कशी दिसते ? बघा लेटेस्ट Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 08:21 IST2023-02-11T08:15:43+5:302023-02-11T08:21:59+5:30

लोकप्रिय टीव्ही शो 'जोधा अकबर' मधील जोधा कुठे गायब आहे.

जोधा अकबर मालिकेतून घराघरात पोहोचलेली परिधी शर्मा अचानक छोट्या पडद्यावरुन गायब झाली. जोधा अकबर नंतर तिला परत फारसं बघितले गेले नाही.

जोधा अकबर सिरिअलमुळे परिधीला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. यातील परिधीचा अभिनय आणि तिची अकबरसोबतची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली.

परिधीने तिच्या साध्या दिसण्याने चाहत्यांचे मन जिंकले. तिच्या वागण्यात, दिसण्यात कुठलाच बडेजाव नव्हता. चाहत्यांना तिचा हाच स्वभाव भलताच आवडला.

परिधीने तिच्या करिअरची सुरुवात 'तेरे मेरे सपने' या मालिकेतून केली. मात्र यातून तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.

यानंतर तिला 'रुक जाना नही' ही मालिका मिळाली. मात्र ही मालिका देखील काही काळातच बंद पडली. यातही परिधीला यश मिळाले नाही.

२०१५ मध्ये परिधीला जोधा अकबर ही मालिका ऑफर झाली आणि ती रातोरात स्टार झाली. तिला मुख्य जोधा ची भूमिका मिळाल्याने तिचे नशीबच उजळले.

परुधीनेही या संधीचं सोनं केलं. तिचा मालिकेतील अभिनय खूपच पसंतीस पडला. तिला यासाठी बेस्ट टीव्ही अॅक्ट्रेसचा अवॉर्डही मिळाला.

मात्र जोधा अकबर मालिका संपल्यानंतर जणू परिधी गायबच झाली. तर परिधी सध्या कुठे आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला.

जोधा अकबर नंतर काही वर्षातच परिधीने लग्न केले. २०१६ मध्ये तिने एका मुलालाही जन्म दिला.

मुलाच्या जन्मानंतर परिधीने 'ये कहा आ गये हम' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले. मात्र फीट नसल्याने तिने हा शो अर्ध्यातच सोडून दिला.यानंतर २ वर्षांनंतर परिधीने २०१८ मध्ये 'पटियाला बेब्स' या मालिकेतून कमबॅक केले.

या शो ला अनेकांनी पसंत केले मात्र शोची क्रेझ हळूहळू संपली.यानंतर तिने 'जग जननी मॉं वैष्णोदेवी' आणि 'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेतही काम केले.

सध्या ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे डान्सचे फोटो व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करत असते