मन काळं अन...! Tanushi Sharma साठी पोस्ट करणं शीजानच्या बहिणीला पडलं महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 14:47 IST2023-01-05T12:17:37+5:302023-01-05T14:47:09+5:30

तुनिषाच्या वाढदिवसानिमित्त शिजानची बहिणी फलकनं एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर लोकांनी तिला वाईट पद्धतीनं ट्रोल केलं आहे.

Falaq Naaz Troll For Wishing Tunisha Sharma Birthday:'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर १० दिवसांपूर्वी आत्महत्या करणाऱ्या तुनिषा शर्माचा ४ जानेवारी २०२३ ला २१ वा वाढदिवस होता. बर्थडे निमित्त आरोपी शिझान खान(Sheezan Khan) ची बहीण फलक नाज (Falaq Naaz) हिने सोशल मीडियावर तुनिषासाठी एक पोस्ट शेअर केली आणि तिच्या भावना व्यक्त केल्या. यामुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे. (Photo Instagram)

फलक नाजने तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) च्या वाढदिवसानिमित्त अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचं आणि तुनिषाचं खास बॉन्ड पाहायला मिळतेय. (Photo Instagram)

तुनिषा शर्मासाठी फलकनं केली पोस्ट फोटोसोबत फलकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुन्नू माझ्या बाळा, मी तुला अशा शुभेच्छा देईन असे कधीच वाटले नव्हते, तुला माहित होते की तू तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले होते, मला तुला सुंदर प्रिंसेस ड्रेसमध्ये बघायची इच्छा होती. (Photo Instagram)

''तुला मी तयार केलं असतं, तुझ्यासाठी केक बनवला असता. तुन्नू, तुला माहिती होते तू माझ्यासाठी काय आहेस ते. मी खूप दु:खी आहे. मला ऐवढा त्रास कधीच झाला नाही जो तुझ्या जाण्यानं झाला आहे. '' (Photo Instagram)

फलक नाज पुढे लिहिते, “कधी कधी कोणासाठी प्रार्थना करावी हे कळतंच नाही. तुझ्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून की आमच्या (अम्मा, शीजन आणि माझ्या) आयुष्यातील कठीण परिस्थितीसाठी. रोज रात्री न लागणारी झोप, डोळ्यात न दिसणारे अश्रू, तू हे सगळं बघते आहेत. मला माहिती आहे की तू आजूबाजूला आहेस. मला तुझी रोज आठवण येतं. माझं बाळ, माझा छोट्यासा जीव तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यू.''(Photo Instagram)

फलक नाज झाली ट्रोल फलकने सोशल मीडियावर तुनिषासाठी पोस्ट करताच लोकांनी तिला ट्रोल करत 'ड्रामेबाज वुमन' म्हटलं आहे. युजर म्हणाला, “तू एक ड्रामेबाज व्यक्ती आहेस… निष्पाप चेहऱ्याच्या मागे काळा रंग आहे, तुझा मिस फलक… दिखावा करणं कुणी तरी तुझ्याकडून शिकलं पाहिजे, आधी भावा-बहिणीने मिळून आत्महत्यास प्रवृत्त केलं आणि आता खुशामत करायला आली… ड्रामेबाज कुठली. " (Photo Instagram)

एका यूजरने सांगितले की, "चीटरची बहीण आता इथे नाटक करत आहे. अभिनय चित्रपटांमध्ये चांगला दिसतो, वास्तविक नाही. एकजण म्हणाला, "खूप नाटकं! तू तिची कधीच पर्वा केली नाहीस. म्हणूनच तुझ्या भावाने त्याचा वापर केला आणि तिला सोडले. (Photo Instagram)