धमाका!!! टायगर 3 ते पठान..., 2023 मध्ये रिलीज होणार हे 12 बिग बजेट सिनेमे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:25 IST2022-03-04T17:11:02+5:302022-03-04T17:25:15+5:30
Movies Release In 2023 : सलमानचा ‘टायगर 3’ आणि शाहरूखचा ‘पठान’ या दोन सिनेमांची रिलीज डेट आलीये. पण याशिवाय अनेक धाकडे सिनेमे 2023 मध्ये तुमच्या भेटीस येत आहेत...

प्रभास आणि सैफ अली खानचा ‘आदिपुरूष’ हा सिनेमा 2023 मध्ये पाहायला मिळणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा पे्रक्षकांच्या भेटीस येतोय.
रणबीर कपूर, परिणीती चोप्रा, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. संदीप रेड्डी दिग्दर्शित हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 ला रिलीज होणे अपेक्षित आहे.
गेल्या महिन्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमाचा टीझर रिलीज केला. 2023 मध्ये नाताळच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
शाहिद कपूरचा ‘बुल’ हा सिनेमाही रिलीजच्या रांगेत आहे. हा सिनेमाही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
फाइटर या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी पहिल्यांदा झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा 2023 साली रिलीज होतोय.
कभी ईद कभी दिवाळी या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. 30 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.
‘गहराइयां’ या सिनेमातील अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. आता ही जोडी ‘खो गए हम कहां’ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमाही 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरची जोडी लव रंजनच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं टायटल अद्याप ठरलेलं नाही. हा सिनेमा 8 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होतोय.
शाहरूख खानचा ‘पठान’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा रणवीर सिंग आणि आलिया भटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 10 फेबु्रवारी 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
अरूण गोपालन यांनी दिग्दर्शित केलेला ‘तेहरान’ हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये चित्रपटगृहांत झळकणार आहे.
‘टायगर 3’ हा चित्रपट सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षीत सिनेमा. 2023 च्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.