सुंदर दिसण्यासाठी 'या' अभिनेत्रींनी केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया; चेहरा खराब झाल्यामुळे आता मिळत नाहीये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:09 IST2022-02-14T18:02:30+5:302022-02-14T18:09:43+5:30
Bollywoord actresses: शस्त्रक्रिया करणं या अभिनेत्रींच्या आलं अंगाशी. अनेक अभिनेत्रींचा चेहरा या शस्त्रक्रियांमुळे सुंदर होण्याऐवजी विद्रुप झाला आहे.

राखी सावंत - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये काम मिळावं यासाठी राखीने प्रचंड प्रयत्न केले. यात तिच्या नावापासून ते दिसण्यापर्यंत तिने अनेक बदल केले.
यात राखीने तिच्या ओठावर प्लास्टिक सर्जरी केली. परंतु, ही सर्जरी अयशस्वी झाल्यामुळे तिचं सौंदर्य खुलण्यापेक्षा त्यात बाधा आली.
कोयना मित्रा - आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी ओळखली जाणारी कोयना मित्रानेदेखील तिच्या नाकावर आणि ओठांवर सर्जरी केली आहे.
परंतु, या सर्जरीनंतर तिच्या रुपात प्रचंड बदल झाला. या सर्जरीनंतर तिच्याकडे येणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स कमी झाल्या.
आयशा टाकिया - आयशा टाकियाच्या प्लास्टिक सर्जरीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.
तिच्या या सर्जरीमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
श्रुती हासन - दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन. श्रुतीनेदेखील तिच्या नाकावर शस्त्रक्रिया केली आहे. परंतु, तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे तिच्याकडे कामाची कमी नाही.
मात्र, तरीदेखील आम्हाला पूर्वीचीच श्रुती आवडत होती, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.