Simple & sober लूकमध्ये प्रार्थनाने दिल्या किलर पोझ; फोटो पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 14:36 IST2022-06-05T14:13:04+5:302022-06-05T14:36:20+5:30

Prarthana Behere: अलिकडेच प्रार्थनाने साडीमध्ये एक फोटोशूट केलं. या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे कायम चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.

सहज, सुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते.

कधी सेटवरील तर कधी वैयक्तिक जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

वेस्टर्न असो वा पारंपरिक प्रत्येक लूकमध्ये प्रार्थना सुंदर दिसते.

अलिकडेच प्रार्थनाने साडीमध्ये एक फोटोशूट केलं. या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोमध्ये प्रार्थनाने लाल रंगाचं लाँग सिल्व्हज ब्लाऊज आणि जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.

हलकासा मेकअप करुनही प्रार्थना या फोटोमध्ये छान दिसत आहे.

प्रार्थनाने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटोशूट केलं आहे.