ना भांडणतंटा, ना विवाहबाह्य संबंध..., एका कुत्र्यामुळे झाला या अभिनेत्याचा घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:47 IST2025-03-03T19:43:34+5:302025-03-03T19:47:58+5:30
Arunodaya Singh News: पडद्यावर मोठे स्टार वाटणारे अनेक कलाकार वैवाहिक जीवनात मात्र अपयशी ठरल्याचं दिसून येतं. विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक वादविवाद, महत्त्वाकांक्षा आदी अनेक कारणांमुळे या कलांकारांचं विवाह तुटतात. मात्र एका कलाकाराचा घटस्फोट वरील कुठल्याही कारणांमुळे न होता चक्का एका कुत्र्यामुळे झाला, असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे.

बॉलिवूडच्या फिल्मी दुनियेतील कलाकारांचे कौटुंबिक जीवन हे बऱ्याचदा अनिश्चिततेने भरलेलं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या क्षेत्रातील कलाकारांचं लग्न तुटणं, घटस्फोट होणं ही सामान्य बाब बनली आहे.
पडद्यावर मोठे स्टार वाटणारे अनेक कलाकार वैवाहिक जीवनात मात्र अपयशी ठरल्याचं दिसून येतं. विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक वादविवाद, महत्त्वाकांक्षा आदी अनेक कारणांमुळे या कलांकारांचं विवाह तुटतात. मात्र एका कलाकाराचा घटस्फोट वरील कुठल्याही कारणांमुळे न होता चक्का एका कुत्र्यामुळे झाला, असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे.
हा कलाकार त्याच्याकडच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम करायचा. मात्र त्याचं दे श्वान प्रेम त्याच्या पत्नीला एवढं खटकलं की, लग्नाला तीन वर्षं होण्यापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. हा कलाकार त्याच्याकडील पाळीव कुत्र्यांना त्याच्या कुटुंबातीलच एक सदस्य मानायचा. मात्र त्याच्या पत्नीला मात्र कुत्र्यांचा घरात असलेला वावर फारसा आवडायचा नाही. त्यावरून या दोघांमध्ये बऱ्याचदा वादविवादही झाले होते. अखेर दररोजच्या भांडणाला वैतागून या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
कुत्र्यांवरील प्रेमामुळे घटस्फोट झालेल्या या अभिनेत्याचं नाव आहे अरुणोदय सिंह. अरुणोदय सिंह याने २०१६ मध्ये कॅनडामधील ली एल्टन हिच्यासोबत अगदी धुमधडाक्यात विवाह केला होता. लग्नानंतर पत्नी-पत्नीमधील नातं सामान्यं होतं. मात्र काही महिन्यांतच त्यांच्यामध्ये खटके उडू लागले.
अरुणोदयच्या घरात असलेल्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि गोंगाटामुळे एल्टन खूप त्रस्त झाली होती. तर अरुणोदयला मात्र पाळीव प्राणी खूप आवडायचे. यावरून दोघांमध्ये रोज वाद होऊ लागले. तसेच त्यांच्या नात्यामध्ये कटुता आली. अरुणोदय सिंह याला कुत्र्यांपासून वेगळं होणं मान्य नव्हतं. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद वाढून अखेर दोघांचं नातं तुटण्यापर्यंत पोहोचलं. तसेच २०१९ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला.
अरुणोदय सिंह हा आता ४२ वर्षांचा असून, या घटस्फोटानंतर त्याने पुन्हा विवाह केलेला नाही. घटस्फोटानंतर तो एकट्यानेच जीवनात पुढे जात आहे. एवढंच नाही तर त्याने आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत बरीच गोपनियता पाळली आहे. एवढंच नाही, तर तो सोशल मीडियावरही फारसा सक्रिय नसतो. दरम्यानच्या काळात त्याने चित्रपट आणि ओटीटीवर आपल्या भूमिकांची छाप पाडली आहे.