'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 00:27 IST2024-09-18T23:52:47+5:302024-09-19T00:27:19+5:30
Mrunal Thakur Royal Saree Look: मूळची मराठमोळी असलेल्या मृणालने आपल्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ घातली आहे

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांपैकी एक मानली जाते.
मृणाल ठाकूर ही मूळची मराठी मुलगी असून तिचा जन्म महाराष्ट्रातील धुळ्यात झाला आहे.
मृणालने अभिनयाची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली. त्यानंतर 'विटी दांडू' या मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
मराठी चित्रपटानंतर मृणाल ठाकूरने २०१८ साली बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. 'लव सोनिया' हा तिचा पहिला चित्रपट होता.
मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये हृतिक रोशन, शाहिद कपूर यांसारख्या सुपरस्टार नायकांसोबत स्क्रीन शेअर केला.
बॉलिवूड पदार्पणानंतर मृणाल ठाकूरने दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सीता रामम या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केले.
मृणालचा ताजा फोटोशूट आणि तिचा सीता रामम मधील लूक हा खूपच मिळताजुळता आहे.
मृणालने त्या सिनेमात राजघराण्यातील राजकन्येची भूमिका केली होती. अगदी तसाच रॉयल लूक तिचा सध्याच्या फोटोशूटमध्ये दिसतोय.
मृणाल बैज रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असून तिच्या या लूकला काही तासांतच लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.