आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:12 IST2025-05-21T17:59:53+5:302025-05-21T18:12:51+5:30

कोण आहे भारतीयांचा आवडता कलाकार? यंदा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित!

चित्रपटसृष्टीत साऊथच्या कलाकारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ऑरमॅक्स मीडियाने अलीकडेच एप्रिल २०२५ची 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' ही यादी जाहीर केली. त्यात साऊथच्या कलाकारांचा दबदबा दिसून आला.

या टॉप १०च्या यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकारांनी जागा मिळवली आहे. तर इतर सात जागांवर साऊथचे सुपरस्टार्स आहेत. यावरून हे लक्षात येते की, साऊथची लोकप्रियता आता वाढत आहे.

बॉलिवूडचे दिग्गज सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या टॉप १०च्या यादीत स्थान निर्माण करू शकले नाहीत.

या यादीत बॉलिवूडमधून केवळ शाहरूख खान ( Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी स्थान मिळवले आहे.

काल ज्युनियर एनटीआरचा (N. T. Rama Rao Jr.) वाढदिवसानिमित्त त्याचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट 'वॉर २' चा टीझर रिलीज झाला. या यादीत अभिनेत्याचं नाव दहाव्या क्रमांकावर आले आहे.

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट 'हेरा फेरी ३' सध्या वादात अडकला आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार असूनही तो या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.

'सिंकदर' फ्लॉप झाल्यानंतर सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. तो या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

अभिनेता राम चरणने (Ram Charan) टॉप १० यादीत सातवे स्थान पटकावले आहे. तर अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा देखील त्याच्यासोबत आहे. यामुळेच त्याने या यादीत सहावे स्थान मिळवले आहे.

टॉप १० अभिनेत्यांच्या यादीत अजित कुमारने (Ajith Kumar) पाचवे स्थान पटकावले आहे. दक्षिण भारतात तो "थाला" (Thala) म्हणून प्रसिद्ध आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी 'AA22 x A6' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अ‍ॅटली कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अल्लू अर्जून या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या मेट गाला पदार्पणामुळे चर्चेत आहे. या यादीत त्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर थलपति विजय (Thalapathy Vijay) आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचा आगामी चित्रपट ''जन नायकन'ची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

या यादीत प्रभास (Prabhas) सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आहे. २०२५ मध्ये प्रभासचा एकही चित्रपट प्रदर्शित होत नाही. तरीही तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.