दिवसेंदिवस वाढतोय नेहाचा बोल्डनेस;पाहा प्रार्थना बेहरेचं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:06 IST2022-02-24T15:00:35+5:302022-02-24T15:06:12+5:30
Prarthana behere:प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अलिकडेच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकत आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्याकडे वळली आहे. त्यामुळे सध्या तिची सर्वत्र चर्चा आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्याकडे वळली आहे. त्यामुळे सध्या तिची सर्वत्र चर्चा आहे.
मालिकेत नेहा कामतची भूमिका साकारणारी प्रार्थना खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस असून तिचे फोटो, व्हिडिओ कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते.
प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अलिकडेच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
प्रार्थनाने लाल रंगाच्या वनपीस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं असून तिचे फोटो सध्या चर्चेत येत आहेत.
या फोटोंसोबतच तिने 'न्यू मी कमिंग सून' असं म्हणत फोटोशूटची झलक दाखवणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
प्रार्थनाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रार्थना सोशल मीडियावर कायम सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करते.