Video: ब्लॅक रंगाच्या साडीत शेफालीचा बोल्ड अंदाज; समीरचं काय नेटकरीदेखील होतायेत घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 13:02 IST2022-05-29T12:54:44+5:302022-05-29T13:02:19+5:30

Kajal kate:या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजल काटे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून सध्या काजल घराघरात चर्चेत येत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काजल, शेफाली ही भूमिका साकारत आहे. सध्या या मालिकेत शेफाली आणि समीर यांचा लव्ह ट्रॅक सुरु आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेली काजल सोशल मीडियावर कायम काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

कधी वेस्टर्न तर कधी पारंपरिक मराठमोळ्या साजशृंगारात काजल फोटो शेअर करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

कलाविश्वात सक्रीय असलेली काजल सोशल मीडियावरही सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अलिकडेच तिने एक नवं फोटोशूट केलं आहे.

काजलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

काजलने यापूर्वीही अनेक मालिकांमध्ये काम केल आहे.

काजल प्रत्येक फोटोच्या माध्यमातून नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेत असते.