रायाची ऑनस्क्रीन आई खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:41 IST2022-02-10T12:37:06+5:302022-02-10T12:41:05+5:30

Vaishali Rajeghatge:कलाविश्वाप्रमाणेच वैशाली या सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा त्या त्यांचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन झालं बाजिंद.

या मालिकेतील राया आणि कृष्णा ही जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे या दोघांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.

परंतु, या मालिकेतील राया व कृष्णा व्यतिरिक्त अन्यही काही भूमिका गाजताना दिसत आहेत. यात खासकरुन रंजना विधाते म्हणजे रायाची आई आणि गुली मावशी या भूमिका लोकप्रिय ठरत आहेत.

या मालिकेत अभिनेत्री वैशाली राजेघाटगे यांनी रायाच्या आईची रंजना विधाते ही भूमिका साकारली आहे.

मालिकेत रंजना एका घरंदाज गृहिणीची भूमिका साकारत असली तरीदेखील खऱ्या आयुष्यात ती प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे.

वैशाली अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना असल्याचं त्यांच्या पोस्टवरुन लक्षात येतं.

कलाविश्वाप्रमाणेच वैशाली या सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा त्या त्यांचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

वैशाली राजेघाटगे खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळ्या असून मालिकेतील त्यांची भूमिका पाहून कोणालाही यावर विश्वास बसणार नाही.

वैशाली राजेघाटगे यांनी शेअर केलेला फोटो